बिहारमध्ये ‘कोरोना’ लसीच्या प्रकरणावर शिवसेनेने सामन्यातून केले ‘लक्ष्य’ – बाकीची राज्ये पाकिस्तानमध्ये आहेत का ? का पुतीन देणार लस

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : बिहार विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने (भाजपा) मतदारांना भूरळ पाडण्यासाठी कोरोनाची लस आल्यावर संपूर्ण राज्यातील लोकांना विनाशुल्क उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन दिले आहे. आता त्यामूळे देशातील राजकीय वातावरण तापलेले दिसत आहे. यासंदर्भात शिवसेनेने मुखपत्र सामनामध्ये भाजपवर निशाणा साधला आहे. शिवसेनेने सामनामध्ये म्हटले की, भाजपचे खरे धोरण काय आहे ? त्यांचा मार्गदर्शक कोण आहे ? याबद्दल थोडा गोंधळ उडालेला दिसत आहे. दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदींनी जनतेला आश्वासन दिले होते की, सरकार कोरोना लस देशातील सर्व लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करेल. लस वाटप करताना पंतप्रधानांनी कुठेही जात, धर्म, प्रांत, राजकारण आणले नाही.

शिवसेनेने सामनामध्ये भाजपच्या जाहीरनाम्यात पहिल्या क्रमांकावर या आश्वासनाचा उल्लेख असल्याचे नमूद करीत अर्थमंत्र्यांना लक्ष्य केले आहे आणि त्याला विचित्र म्हटले आहे. शिवसेनेने असा सवालही केला आहे की ज्या राज्यांमध्ये भाजपचे सरकार नाही, ती राज्ये पाकिस्तानात आहेत का? का या राज्यांना कोरोनाची लस पुतिन देतील.

कोरोना युगात होणाऱ्या निवडणुका रॅलीबाबतही शिवसेनेने सामनाच्या संपादकीयात लक्ष वेधले आहे. नेत्यांची हेलिकॉप्टर उडत आहेत आणि अमानुष गर्दी ओसंडत असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे. या गर्दीत, कदाचित कोरोना बळी पडेल आणि राजकीय क्रांती होईल. संपादकीयमध्ये भाजपवर टीका करताना म्हटले की, बिहारमध्ये निर्णय घ्यावा लागेल, परंतु लोकांच्या मनात कोरोनाची भीती निर्माण करून भाजपने मोफत लस टोचण्याचा ‘फोकट’ उद्योग सुरू केला आहे.

मोफत लस केवळ बिहारलाच का ?

शिवसेनेने संपादकीयमध्ये म्हटले की, सत्ता मिळविण्यासाठी आणि मतदारांना भूरळ घालण्यासाठी नैतिकतेचा पक्ष केणत्या खालच्या स्तरावर जाऊ शकतो, हे आता समजले. मोफत लस फक्त बिहारलाच का ? संपूर्ण देश का नाही? कोरोनाने देशभरात तांडव केले आहे. हा आकडा 75 लाखांपेक्षा जास्त झाला आहे. लोक दररोज आपला जीव गमावत आहेत. अश्या परिस्थितीत एक असे राज्य जिथे विधानसभेच्या निवडणुका चालू आहेत, तिथे अश्या प्रकारचे राजकारण होणे खेदजनक आहे.

सामनामध्ये म्हटले की, बिहार निवडणुकीतून विकास गायब झाला आहे. कोरोना लस देशभरात आवश्यक आहेत. लसांचा शोध तिसऱ्या टप्प्यात पोहोचला आहे, परंतु बिहारमध्ये भाजपाला प्रथम मतदान करणार्‍यांना ही लस दिली जाईल, परंतु समजा, जर बिहारमध्ये सत्ता बदलली तर भाजपा बिहारला लस देणार नाही का? बर्‍याच राज्यात भाजपाचे सरकार नाही. केंद्र सरकार त्यांनाही लस देताना हात वर करेल का? जर विरोधी पक्षाच्या आमदाराला कोरोना असेल तर भाजपकडून आपणास म्हटले जाईल की, तुम्हाला लस हवी असेल तर आधी पक्ष बदलून घ्या, नाहीतर ओरडत बसा.