COVID-19 : 15 ऑगस्टला लाँच होऊ शकते ‘कोरोना’चे स्वदेशी वॅक्सीन COVAXIN

नवी दिल्ली : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामध्ये एक चांगली बातमी अहे. 15 ऑगस्टला कोरोना वॅक्सीन कोवॅक्सीन लाँच होऊ शकते. हे वॅक्सीन फार्मास्यूटिकल कंपनी भारत बायोटेकने तयार केले आहे. भारत बायोटेक आणि आयसीएमआरकडून वॅक्सीन लाँचिंग शक्य आहे.

नुकतीच कोवॅक्सीनला ह्यूमन ट्रायलची परवानगी मिळाली आहे. आयसीएमआरकडून जारी लेटरनुसार, 7 जुलैपासून ह्यूमन ट्रायलसाठी इनरोलमेंट सुरू होईल. यानंतर सर्व ट्रायल यशस्वी झाल्यास 15 ऑगस्टपर्यंत कोवॅक्सीन लाँच करण्यात येईल. सर्वातआधी भारत बायोटेकची वॅक्सीन मार्केटमध्ये येऊ शकते.

हे पत्र आयसीएमआर आणि सर्व स्टेकहोल्डर (ज्यामध्ये एम्सचे डॉक्टरसुद्धा सहभागी आहेत.) ने जारी केले आहे. त्यांचे म्हणणे आहे की, जर ट्रायलचा प्रत्येक टप्पा यशस्वी झाला तर 15 ऑगस्टपर्यंत कोरोनाची वॅक्सीन कोवॅक्सीन मार्केटमध्ये येऊ शकते, असा आयसीएमआरकडून अंदाज व्यक्त केला जात आहे.

मागच्या काही दिवसात हैदराबादची फार्मा कंपनी भारत बायोटेकने दावा केला होता की, त्यांना कोवॅक्सीनच्या फेज-1 आणि फेज-2 च्या ह्यूमन ट्रायलसाठी डीसीजीआयकडून हिरव्या झेंडा मिळाला आहे. कंपनीने हेसुद्धा म्हटले की, ट्रायलचे काम जुलैच्या पहिल्या आठवड्यात सुरू करण्यात येईल. भारत बायोटेकला वॅक्सीन बनवण्याचा अनुभव आहे.

भारत बायोटेक कंपनीने पोलियो, रेबीज, रोटाव्हायरस, जपानी इन्सेफ्लायटिस, चिकनगुनिया आणि झिका व्हायरससाठी सुद्धा वॅक्सीन बनवली आहे. ह्यूमन ट्रायलसाठी इनरॉलमेन्टची सुरूवात 7 जुलैपासून होऊ शकते. यानंतर टप्प्याटप्प्याने ट्रायल करण्यात येईल. जर ट्रायल यशस्वी झाली तर 15 ऑगस्टला वॅक्सीन लाँच करण्यात येईल.