Coronavirus: AIIMS मध्ये Covaxin च्या ट्रायलमध्ये समस्या, प्रत्येक 5 पैकी एका स्वयंसेवकामध्ये आधीपासूनच ‘अँटीबॉडी’

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : जगभरात कोरोना विषाणूच्या प्रकरणांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. जगभरात या प्राणघातक संसर्गावर विजय मिळविण्यासाठी अनेक संभाव्य लस चाचण्या सुरू आहेत. या चाचण्या मानवांवर होत आहेत. दिल्लीतील ऑल इंडिया इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) येथे भारताच्या संभाव्य लस कोव्हॅक्सिन (Covaxin) ची मानवी चाचणी दोन आठवड्यांपूर्वी सुरू झाली होती, परंतु आता यात एक समस्या दिसत आहे. या क्लिनिकल मानवी चाचणीत भाग घेणाऱ्या 20 टक्के स्वयंसेवकांच्या शरीरात कोरोना विषाणूविरूद्धची अँटीबॉडीज आधीच अस्तित्वात आहेत. अशा परिस्थितीत ते चाचणीयोग्य नाहीत. त्यांचे प्रमाण दर पाच स्वयंसेवकांपैकी एक आहे.

एम्सच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एम्सने दोन आठवड्यांपूर्वी स्वदेशी लस कोव्हॅक्सिनच्या मानवी क्लिनिकल चाचण्यांची प्रक्रिया सुरू केली. या वेळी सुमारे 80 स्वयंसेवकांची स्‍क्रीनिंग करण्यात आली. परंतु यापैकी केवळ 16 जण चाचणीसाठी उपयुक्त असल्याचे आढळले. संस्था 100 स्वयंसेवकांमध्ये सुमारे 2 आठवड्यांसाठी कोव्हॅक्सिनच्या प्रभावाचा अभ्यास करणार होती. कोरोना विषाणूची संभाव्य लस कोव्हॅक्सिनच्या मानवी चाचणीत सामील होणाऱ्या 18 ते 55 वयोगटातील स्वयंसेवकांना आधीपासूच किडनी, लिव्हर, फुफ्फुस, डायबिटीज सारख्या समस्या नसाव्यात. या स्वयंसेवकांवर मानवी चाचण्या घेण्यापूर्वी या सर्वांची तपासणी घेण्यात येत आहे.

एम्समधील कोव्हॅक्सिनच्या मानवी चाचण्यांचा बारकाईने अभ्यास केलेल्या डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार रिजेक्‍शनचे प्रमाण बरेच जास्त आहे. आम्ही केवळ निरोगी स्वयंसेवक घेत आहोत. आम्हाला सुमारे 20 टक्के स्वयंसेवकांच्या शरीरात आधीपासूनच कोरोना विषाणूविरूद्धच्या अँटीबॉडी सापडल्या आहेत. अँन्टीबॉडीचा अर्थ असा आहे की त्या व्यक्तीस आधीच कोरोना विषाणूची लागण झाली आहे आणि आता तो बरा झाला आहे. अशा परिस्थितीत या स्वयंसेवकांमध्ये लसीचा परिणाम दिसणे कठीण आहे.

एम्सला स्वदेशी लस कोव्हॅक्सिनच्या मानवी चाचणीसाठी 3500 हून अधिक अर्ज प्राप्त झाले होते. 24 जुलै रोजी कोव्हॅक्सिनचा पहिला डोस 30 वर्षीय व्यक्तीला दिला गेला. पहिला आठवडा तो एकदम ठीक राहिला. आता डॉक्टर त्याच्याकडे अधिक लक्ष ठेवून आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like