‘मास्क परिधान करताना अन् काढल्यानंतर तुम्ही देखील करता याच चुका ?’ तज्ज्ञांनी सांगितला बचावाचा उपाय

पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनापासून (Covid-19) बचाव करण्यासाठी सर्व लोक मास्कचा (Mask) वापर करत आहेत. तरीही काही लोक निष्काळजीपणा करताना दिसत आहेत. बोलताना, चालताना किंवा सार्वजनिक ठिकाणी मास्क काढला तर मोठी किंमत मोजावी लागू शकते. कारण यामुळं नकळत कोरोना संसर्ग होऊ शकतो. तज्ज्ञांनी मास्कच्या वापराबद्दल काही गाईडलाईन्स (Guidelines on use of masks) जारी केल्या आहेत.

भारतात कोव्हॅक्सिन कधीपर्यंत उपलब्ध होणार ?
वरिष्ठ वैज्ञानिक डॉ रमन गंगाखेडकर (Dr Raman Gangakhedkar) यांनी एका वृत्तपत्रासोबत बोलताना सांगिलतं की, सद्या देशात 3 लसींवर (Coronavirus Vaccine) काम सुरू आहे. पिहली झायडस कँडिला लस, दुसरी सीरम इंस्टिट्युटची कोविशिल्ड, आणि तिसरी भारत बायोटेक कोव्हॅक्सिन, या 3 पैकी कोणती लस यशस्वी ठरते याकडे लक्ष देणं महत्त्वाचं ठरेल. भारतात लसीची उत्पादन क्षमता अधिक असल्यानं कोणत्याही देशात लस तयार झाल्यास उत्पादनासाठी भारतातच यावं लागणार आहे. देशातील लोकसंख्येच्या तुलनेत इतर देशांतील लोकांना लस मिळण्यास वेळ लागू शकतो.

‘येत्या काही महिन्यांमध्ये अजून सावधगिरी बाळगावी लागेल’
पुढं त्यांनी सांगितलं की, नवीन कोरोना रुग्णांमध्ये घट होणं ही चांगली गोष्ट आहे. त्यामुळं रुग्णालयात बेड खाली असल्यानं रुग्णांना सहज बेड मिळत आहेत. टेस्टींग आणि लोकांच्या मेहनतीमुळं हे शक्य झालं आहे. मात्र येत्या काही महिन्यांमध्ये अजून सावधगिरी बाळगावी लागेल. परंतु उत्सवांना सुरुवात होत आहे. त्यामुळं लोक मोठ्या संख्येनं सणावाराची तयारी करण्यासाठी घराबाहेर पडत आहेत. या स्थितीमुलं संक्रमणाचा धोका वाढू शकतो.

‘तर समाजातील अर्ध्यापेक्षा जास्त लोक हे कोरोना संक्रमित असले असते’
डॉ. रमन गंगाखेडकर म्हणाले, कोरोना व्हायरसचा प्रसार संक्रमित व्यक्तीच्या ड्रॉपलेट्सच्या माध्यमातून होतो. जास्तीत जास्त लोकांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणं दिसून येत नाहीत. अशा स्थितीत आयसोलेट करणं कठिण असतं. कारण एसिम्प्टोमेटीक रुग्णांमध्ये संक्रमण ओळखणं सोपं नसतं. जर चाचण्यांचं प्रमाण अधिक वाढवण्यात आलं असतं तर समाजातील अर्ध्यापेक्षा जास्त लोक हे कोरोना संक्रमित असले असते.

मास्कबद्दल अशी घ्या काळजी
मास्कबद्दल गाईडलाईन्स देताना डॉ. रमन गंगाखेडकर यांनी सांगितलं की, मास्कबाबत अधिक सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे. सध्या लोक मास्कचा वापर करताना निष्काळजीपणा करताना दिसून येत आहेत. अनेकजण बोलताना, हसताना मास्क वर-खाली करतात. अशात बाहेरील व्हायरस सहज शरीरात प्रवेश करू शकतो. म्हणून शक्यतो मास्कला स्पर्श करणं टाळा. मास्क लावताना आणि काढताना हात साबणानं स्वच्छ धुतलेले असावेत. एखाद्या व्यक्तीसोबत बोलताना मास्क काढून बोलू नका. दोन किंवा तीन मास्क नेहमी स्वच्छ धुतलेले स्वत: सोबत ठेवावेत. वापरानंतर मास्क साबणानं स्वच्छ धुवावेत. एका दिवसाच्या अंतरानं ते पुन्हा वापरावेत असंही ते म्हणाले.

You might also like