‘कोरोना’ फॅमिलीतून 17 वर्षापूर्वी पसरली होती ‘महामारी’, यामुळे बनली नाही ‘वॅक्सीन’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी अनेक देशांमध्ये वॅक्सीन तयार करण्याचे काम सुरू आहे. परंतु, काही एक्सपर्ट या गोष्टीचा उल्लेख करतात की, अनेक वर्षांपूर्वीच कोरोना फॅमिलीच्या व्हायरसबाबत जगाला माहिती मिळाली होती, परंतु आजपर्यंत एकही वॅक्सीन बनू शकली नाही. अखेर कोणत्या कारणामुळे शास्त्रज्ञ कोरोना फॅमिलीच्या जुन्या व्हायरससाठी वॅक्सीन का बनवू शकले नाहीत?

कोरोना फॅमिलीमधीलच एक व्हायरस सार्स-कोव्ह-1 पासून 2003 मध्ये महामारी पसरली होती. तेव्हा सुद्धा पहिले प्रकरण चीनमधून समोर आले होते. यादरम्यान, कमीतकमी 774 लोक मारले गेले होते आणि 8 हजारपेक्षा जास्त संक्रमित झाले होते. परंतु, 17 वर्षानंतर सुद्धा सार्स-कोव्ह-1साठी कोणतीही वॅक्सीन तयार होऊ शकली नाही. शास्त्रज्ञांनी कोरोना फॅमिलीच्या व्हायरससाठी यापूर्वीही काम सुरू केले होते, परंतु नंतर एकही प्रोजेक्ट सुरू झाल्यानंतर शेवटपर्यंत पोहचू शकला नाही. यास दुर्लक्षदेखील कारणीभूत आहे. कारण काही शास्त्रज्ञांना निधीची कमतरता जाणवत होती, तर काहींकडे राज्यकर्त्यांनी गांभिर्याने पाहिलेच नाही.

हफिंग्टन पोस्टमध्ये छापलेल्या रिपोर्टनुसार, कोलंबिया युनिव्हर्सिटीच्या वेगलोस कॉलेज ऑफ फिजिशियन्स अ‍ॅण्ड सर्जन्समध्ये मायक्रोबायोलॉजी आणि इम्यूनोलॉजीचे प्रोफेसर विन्सेंट रकानिएलो म्हणतात, 2003 मध्ये सुद्धा सार्स महामारी थांबली होती, यासाठी बहुतांश कंपन्यांनी म्हटले की, त्यांना या व्हायरसवर औषध बनवायचे नाही, कारण त्यास मार्केट नव्हते. परंतु, काही अकॅडमिक्सने प्रयोगासाठी सार्सची वॅक्सीन तयार केली. परंतु, आर्थिक सहकार्य न मिळाल्याने प्रोजेक्ट पूर्ण झाले नाहीत.

प्रोफेसर विन्सेंट यांनी म्हटले की, हे खुप अवघड नसते. आम्ही वटवाघळांमधून मिळणार्‍या कोरोना व्हायरसची वॅक्सीन तयार केली असती, जी अन्य कोरोना व्हायरसपासून देखील वाचवू शकली असती. पण, आर्थिक मदतीच्या अभावामुळे रिसर्च पूर्ण नाही झाले नाहीत. विन्सेंटने म्हटले की, अमेरिकेची प्रमुख आरोग्य संस्था नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सुद्धा अशाप्रकारच्या महत्वाच्या रिसर्चसाठी मदत करण्यास तयार नव्हती, कारण त्यांच्याकडे मर्यादित बजेट होते.

तर, प्रोफेसर विन्सेंट यांनी म्हटले की, 2020 च्या शेवटपर्यंत कोरोनाच्या वॅक्सीनची अपेक्षा करणे अवास्तव ठरेल. इतक्या कमी वेळात आम्ही कोणतीही वॅक्सीन बनवलेली नाही. पुढील वर्षी उन्हाळ्यापर्यंत वॅक्सीनची अपेक्षा करणे उचित ठरेल.