coronavirus Vaccine | कोरोना व्हॅक्सीनच्या अगोदर चुकूनही घेऊ नका पेन किलर्स, WHO ने केले सावध

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  कोरोनापासून (Corona) बचावाचा एकमेव पर्याय व्हॅक्सीन (Vaccine) घेणे हाच आहे. मात्र, अजूनही काही लोक साईड इफेक्टला घाबरून Coronavirus Vaccine घेणे टाळत आहेत. परंतु काही लोक असेही आहेत जे साईड इफेक्ट (Side effects) पासून वाचण्यासाठी pain killer खाऊन व्हॅक्सीन घेण्यासाठी जात आहेत. हेल्थ एक्सपर्ट (Health Expert) लोकांना व्हॅक्सीनच्या अगोदर कोणत्याही प्रकारचे pain killer औषध घेण्यास मनाई करत आहेत. coronavirus Vaccine| experts are warning taking painkillers before getting vaccine

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हेल्थ एक्सपर्टचे म्हणणे आहे की, पेन किलर्स केवळ व्हॅक्सीन घेतल्यानंतच घेतली पाहिजे.
पेन किलर्स वेदना आणि सूज कमी करण्याचे काम करते.
यापैकी बहुतांश औषधे नॉन स्टेरायडल अँटी-इंफ्लेमेटरी (NSAIDs) असतात ज्यामध्ये वेदना कमी करणारे कमेकिल असतात.
यामध्ये सार्वत सामान्य औषध पॅरासिटामॉल आहे.

हे पन किलर्स सातत्याने घेणे चांगले नाही. अनेक अभ्यासात समोर आले आहे की, वेदनाशामक औषधे आणि NSAIDs चा जास्त काळ वापर केल्यास आजाराचा धोका वाढतो.
व्हॅक्सीन घेण्यापूर्वी अशा औषधांचा वापर व्हॅक्सीनच्या क्षमतेवर पडू शकतो, जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) याबाबत सावध केले आहे.

व्हॅक्सीन घेण्यापूर्वी वेदनाशामक घेतल्यास व्हॅक्सीन प्रति इम्यून रिस्पॉन्स कमी होतो.
जर व्हॅक्सीन घेण्यासाठी जात असाल तर केवळ साईड इफेक्ट्स टाळण्यासाठी अशाप्रकारचे औषध घेऊ नये. या गोष्टीचे आता पुरावे उपलब्ध झाले आहेत की, व्हॅकसीनसोबत हे औषध मिळून कसे रिअ‍ॅक्ट करते. व्हॅक्सीनच्या अगोदर असे ओषध घेतल्यास नुकसान होऊ शकते कारण,
प्रत्येक व्हॅक्सीनचा प्रत्येक व्यक्तीवर वेगळा परिणाम होतो.

एंटीइन्फ्लामेट्री औषधे इम्यून रिस्पॉन्समध्ये अडथळा आणतात
आणि यामुळे अँटीबॉडी कमी प्रमाणात तयार होते हा स्टडी जर्नल ऑफ वायरोलॉजीमध्ये प्रसिद्ध झाला आहे.

Web Title : coronavirus Vaccine| experts are warning taking painkillers before getting vaccine

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

DFCCIL recruitment 2021 | DFCCIL मध्ये नोकरीची सुवर्णसंधी ! तब्बल 1074 जागासाठी भरती, जाणून घ्या