Coronavirus Vaccine Free | उद्यापासून सर्वांसाठी मोफत कोरोना व्हॅक्सीन, CoWin वर अगोदर रजिस्ट्रेशनची आवश्यकता नाही

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसविरूद्ध भारतात लसीकरणाचा (Coronavirus Vaccination) पुढील टप्पा 21 जूनपासून सुरू होत आहे. या अंतर्गत केंद्र सरकार 18 वर्षावरील लोकांसाठी मोफत व्हॅक्सीन Coronavirus Vaccine Free देणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी मागील 7 जूनला घोषणा केली होती की, राज्यांना लस निर्मिती कंपन्यांकडून व्हॅक्सीन खरेदी करावी लागणार नाही. केंद्र 75 टक्के व्हॅक्सीन खरेदी करेल आणि ती राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना मोफत वितरित करेल.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

आता राज्य काय करणार ?
केंद्राने दिलेले व्हॅक्सीनचे डोस आता राज्य 18 वर्षावरील सर्व लोकांना मोफत देतील. मात्र, या दरम्यान आरोग्य कर्मचारी, फ्रटलाईन वर्कर, 45 वर्षावरील नागरिक आणि नंतर ते नागरिक ज्यांचा दुसरा डोस बाकी आहे, आणि त्यानंतर 18 वर्ष आणि त्यावरील नागरिकांना लसीकरणात प्राधान्य दिले जाईल.

कोणत्या राज्याला व्हॅक्सीनचे किती डोस ?
लोकसंख्या, कोरोना प्रकरणांची संख्या आणि लसीकरणात वाया जाणारी लस, हे काही असे आधार आहेत,
ज्याद्वारे राज्यांना केल्या जाणार्‍या व्हॅक्सीन पुरवठ्यावर केंद्र सरकार निर्णय घेईल.

Coronavirus in Pune | पुण्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे 266 नवे पॉझिटिव्ह, जाणून घ्या इतर आकडेवारी

आता खासगी हॉस्पिटल काय करणार ?
खासगी हॉस्पिटल उर्वरित 25 टक्के व्हॅक्सीनची खरेदी थेट लस निर्मिती कंपन्यांकडून करू शकतात.
राज्य आणि केंद्रशासित प्रदेश खासगी हॉस्पिटलच्या मागणीचा रेकॉर्ड आपल्याकडे ठेवतील, जेणेकरून राज्यातील सर्व हॉस्पिटलना समान भाग मिळेल.
खासगी हॉस्पिटल व्हॅक्सीनसाठी शुल्क वसूल करू शकतात,
परंतु केंद्र सरकाने यावर मर्यादा ठरवली आहे.

कोविनवर रजिस्ट्रेशन आवश्यक नाही
21 जूनपासून सुरू होणार्‍या लसीकरणाच्या पुढील टप्प्यात Cowin.gov.in वर अगोदर रजिस्ट्रेशन करणे आवश्यक नाही. सर्व सरकारी आणि खासगी लसीकरण केंद्रावरच ही सुविधा लोकांना पुरवली जाईल.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Web Titel : coronavirus vaccine free from june 21st for all age cowin registration not mandatory in marathi

हे देखील वाचा

PM-Kisan | 10.34 कोटी शेतकर्‍यांना मिळाला पीएम किसानच्या आठव्या हप्त्याचा लाभ, लवकर करा रजिस्ट्रेशन

Modi Government | खुशखबर ! मोदी सरकार घरबसल्या देत आहे 2 लाख रुपये; केवळ 30 जूनपूर्वी करावे लागेल ‘हे’ काम