काय सांगता ! होय, ‘कोरोना’च्या साथीमुळं ‘हा’ प्राध्यापक बनला ‘अब्जाधीश’, संपत्ती 17 हजार टक्क्यांनी वाढली

पोलिसनामा ऑनलाईन टीम – कोरोनामुळे विविध देशामध्ये लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. लॉकडाउनदरम्यान अनेक उद्योगधंदे बंद ठेवण्यात आल्याने लाखो लोक बेरोजगार झाली आहे. सर्व सामान्यांबरोबरच श्रीमंतांनाही करोनाचा चांगलाच फटका बसला आहे. मात्र या परिस्थितीमध्येही काही महत्वाच्या श्रेत्रांशी संबंधित असणार्‍या व्यक्तींच्या संपत्तीमध्ये घसघशीत वाढ झाल्याचे दिसून आले आहे. 72 वर्षीय टिमोथी स्प्रिन्गर व्यक्तीच्या संपत्तीमध्ये तर 17 हजार टक्क्यांनी वाढ झाली आहे.

हार्डवर्ड विद्यापीठामध्ये प्राध्यापक असणार्‍या टिमोथी यांनी अब्जाधीश होण्याआधीच आपण भरपूर पैसा कमवला असल्याचे म्हटले होते. सध्या मी माझ्यासाठी गरजेपेक्षा अधिक पैसा कमवला आहे. मला अजून पैश्याची गरज आहे असे वाटत नसल्याचे म्हटले आहे. मॉर्डर्ना ही अमेरिकेमधील बायोटेक्नोलॉजी क्षेत्रामधील प्रमुख कंपन्यांपैकी एक आहे. ही कंपनी सध्या कोरोनावर लस बनवण्यासंदर्भात काम करत आहे. केंब्रिज आणि मॅसॅच्युसेट्समधील या कंपनीच्या समभागांची किंमत काही दिवसांपूर्वी (22 एप्रिल रोजी) 152 टक्क्यांनी वाढली. त्यामुळेच टिमोथी हे अब्जाधीश झाले आहे. टिमोथी यांच्याबरोबर करोनाच्या साथीमुळे आर्थिक फायदा झालेल्यांच्या यादीमध्ये डॉकसइन या डिजीटल कंपनीचे अध्यक्ष कीथ क्रॅच, झूम या व्हिडिओ कॉलिंग अ‍ॅपचे एरिक युआन यांचाही समावेश आहे.

टिमोथी हे अमेरिकेमधील सर्वात श्रीमंत विद्वानांपैकी एक आहेत. हार्डवर्ड विद्यापिठामध्ये मेडिकलचे प्राध्यापक असणार्‍या टिमोथी यांनी 1999 साली मिलेनियम फार्मास्युटीकल्स ही कंपनी विकत घेतील होती. त्यावेळी त्यांच्याकडे 100 दशलक्ष डॉलर होते. त्यांनी पाच दशलक्ष डॉलर मॉर्डर्नामध्ये गुंतवले 2018 साली ही कंपनी सर्वजनिक क्षेत्रामध्ये आली.

त्यानंतर टिमोथी यांचा कंपनीतील हिस्सा 800 दशलक्ष डॉलर्स इतकी झाली. जगभरामध्ये वेगवेगळ्या देशांमध्ये 70 हून अधिक लसींवर संशोधन सुरु असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. भारतामध्येही सायरस व अदार पूनावाला यांच्या अंतर्गत येणार्‍या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये करोना लसीसंदर्भात चाचणी सुरु आहे.