Coronavirus : ‘या’ स्थितीत असतो हार्ट अटॅकचा धोका, ‘या’ पद्धतीने कराव बचाव; जाणून घ्या

नवी दिल्ली : कोरोनाच्या आजारातून बरे झाल्यानंतर सुद्धा कोणत्या ना कोणत्या आजाराचा धोका कायम असतो. विशेषकरून हृदयच्या रूग्णांना कोरोनातून बरे झाल्यानंतर हार्ट अटॅक (Heart attack) क्लॉटिंग आणि हार्ट फेल्यूअरच्या (Heart attack) आव्हानांचा सामना करावा लागतो. अशावेळी डॉक्टरच सांगू शकतात की, कोरोनातून बरे झाल्यानंतर हृदयाची काळजी कशा प्रकारे घेतली पाहिजे.

लखनऊच्या सहारा हॉस्पिटलचे प्रसिद्ध कार्डियोलॉजिस्ट डॉक्टर गौतम स्वरूप यांनी म्हटले की, हृदयाच्या बाबतीत कोरोना रूग्णांनी नेहमी सतर्क राहिले पाहिजे. हृदयाशी संबंधीत कोणत्याही लक्षणाकडे दुर्लक्ष करू नये. कोरोनातून बरे झाल्यानंतर हृदयाची तपासणी आवश्य केली पाहिजे.

ब्लड प्रेशर, हृदयाचे आजार असतील तर व्हॅक्सीनने धोका आहे का –

डॉक्टर गौतम यांचे म्हणणे आहे की, हृदयाचे आजार असलेल्या रूग्णांनी व्हॅक्सीनला घाबरण्याचे कारण नाही उलट अशा लोकांनी लवकरात लवकर व्हॅक्सीन घेतली पाहिजे. या लोकांना व्हॅक्सीनचा सर्वात जास्त फायदा होईल.

वजन कमी करण्यासाठी उन्हाळ्यात आवश्य प्या हे 3 डिटॉक्स ड्रिंक्स, जाणून घ्या बनवण्याची पध्दत

डॉक्टर गौतम यांच्यानुसार, हृदयाच्या रूग्णांमध्ये व्हॅक्सीनमुळे कोणत्याही प्रकारच्या क्लॉटिंगचा धोका नाही. याशिवाय, एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही हृदयाचे रूग्ण असाल तर कोरोना संक्रमित झालेले असताना किंवा नंतर व्हॅक्सीन सुद्धा आपली नियमित औषधे घेणे बंद करू नका.

कोरानातून बरे झाल्यानंतर अशी घ्या हृदयाची काळजी –

* बरे झाल्यानंतर ऑक्सीजन लेव्हल 94 पेक्षा कमी असेल तर सावध व्हा, डॉक्टरांकडे जा. हा फुफ्फुसात पोस्ट कोविड क्लॉटिंगचा संकेत असू शकतो. यामुळे रूग्णाला हार्ट अटॅक येऊ शकतो.

* कोरोनातून बरे होत असलेल्या रूग्णांनी भरपूर पाणी प्यायले पाहिजे, प्रोटीनयुक्त आहार घेतला पाहिजे. भरपूर झोप घेतली पाहिजे. यामुळे रूग्ण लवकर रिकव्हर होतो.

 

Also Read This : 

 

Pune : Lockdown काळात सेक्सटॉर्शनच्या तक्रारीत वाढ; तब्बल 150 जणांना ‘तसलं’ चॅट करणं आलं अंगलट

 

संसर्ग नियंत्रित करण्यास नैसर्गिक औषध उपयुक्त; जाणून घ्या

 

EPFO नं पुन्हा दिली PF अकाऊंटमधून पैसे काढण्याची ‘विशेष’ सूट, केवळ 3 दिवसात मिळेल रक्कम; जाणून घ्या

 

मल्टीविटामिनने भरलेल्या शेवग्याच्या भाजीचे ‘हे’ आश्चर्यकारक फायदे; Drumstick चे फुलं, पानं अन् साल देखील खुपच फायद्याची, जाणून घ्या

 

‘पिंपरी- चिंचवडमध्ये अजित पवारांनी विकासकामे करुनही नशिबी पराभवच आला’ – राज ठाकरे

 

Required Test After Isolation : आयसोलेशनच्या नंतर कोण-कोणत्या टेस्ट करणे आवश्यक, जाणून घ्या