Coronavirus : ‘कोरोना’ व्हायरसच्या लढाई दरम्यान आशेचा किरण, यंदाच भारताला मिळू शकते ‘लस’

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : भारतासह संपूर्ण जगभरात कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव वाढतच चालला आहे. अनेक देशांमध्ये आता या साथीचा नाश करण्यासाठी लस तयार करण्याचे काम सुरू आहे. परंतु या संकटाच्या पार्श्वभूमीवर भारतासाठी आशा निर्माण झाल्या आहेत, कारण वर्षाच्या अखेरीस भारताला कोरोनाशी लढा देण्यासाठी लस मिळू शकेल. यूकेच्या ऑक्सफोर्ड विद्यापीठातही याची ट्रायल सुरू आहे. जगप्रसिद्ध लसशास्त्रज्ञ आणि प्राध्यापक अ‍ॅड्रियन हिल यांनी दावा केला कि, सप्टेंबरपर्यंत जगातील पहिली लस तयार होईल, जी कोरोनाला पराभूत करण्यात मदत करेल. प्रोफेसर हिल यांनी सांगितले कि, जर चाचणी पूर्णपणे ठीक झाली तर सप्टेंबरनंतर या औषधाचा पुरवठा सुरू होईल. भारतातही हे औषध वर्षाच्या अखेरीस येऊ शकते.

ही लस बनवण्याच्या एका मोठ्या प्रोजेक्टमध्ये काम करणारे अ‍ॅड्रियन हिल म्हणाले की, बऱ्याच लसांची चाचणी सुरू आहे, ऑक्सफोर्ड येथेही अशीच लस चालू आहे. आम्हाला आशा आहे की आम्ही या चाचणीत यशस्वी होऊ, त्यानंतर आमचे लक्ष अधिकाधिक लस तयार करण्यावर असेल. तसेच चाचण्यांनुसार केवळ एक डोस कोरोना विषाणूविरूद्ध कार्य करण्यास सक्षम असेल. या प्रकल्पात आम्हाला मदत करणार्‍यांमध्ये भारतीय प्राध्यापकांचा समावेश असल्याचे ब्रिटिश प्राध्यापकांचे म्हणणे आहे. हिलच्या मते, तयार केली जाणारी लस यशस्वी होण्याची अपेक्षा आहे, परंतु यासाठी रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असणे आवश्यक आहे, त्या आधारावर ते लवकरात लवकर कार्य करू शकेल.

त्याच प्रकल्पावर काम करणारे अदार पूनावाला म्हणतात की, दोन आठवड्यांनंतर आम्ही एका महिन्यात 5 दशलक्ष डोस देऊ शकू आणि त्यानंतर त्याचा वेग एका महिन्यात 10 दशलक्ष डोसपर्यंत पोहोचेल. या प्रकल्पामध्ये आम्हाला बर्‍याच लोकांचा पाठिंबा मिळत आहे आणि जगभरातील लोक मदतीसाठी पुढे येत आहेत. पूनावाला यांच्या म्हणण्यानूसार, जर क्लिनिकल चाचण्या आणि इतर चाचण्या पूर्णपणे व्यवस्थित आल्या तर या वर्षाच्या अखेरीस आपल्याला औषधे मिळू शकतात.

दरम्यान, कोरोना विषाणू या साथीच्या रोगाने जगभरातील 25 लाखांहून अधिक लोकांना ग्रासले आहे, तर आतापर्यंत 1 लाख 80 हजारांहून अधिक लोक मरण पावले आहेत. अशा परिस्थितीत प्रत्येक मोठी महासत्ता लस तयार करण्याचा प्रयत्न करीत आहे.