Coronavirus Vaccine India : Z+ सारख्या सुरक्षेत पुण्याहून दिल्लीत पोहचली कोरोना व्हॅक्सीन, अधिकार्‍यांनी केली पूजा (व्हिडीओ)

नवी दिल्ली : देशात कोरोनाची व्हॅक्सीन (Coronavirus Vaccine ) 16 जानेवारीला देण्यात येणार आहे. यापूर्वी केंद्र सरकारने म्हटले आहे की, 3 कोटी आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइनच्या लसीकरणाचा खर्च केंद्र सरकार करणार आहे. देशात सध्या सीरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडियाद्वारे निर्मित एस्ट्रेजेनेका-ऑक्सफोर्डची कोविशील्ड आणि भारत बायोटेक, आयसीएमआर आणि एनआयव्ही पुणेद्वारे निर्मित कोव्हॅक्सीनच्या इमर्जन्सी वापराला मंजूरी दिली आहे. सोमवारी महाराष्ट्राच्या पुणे विमानतळावरून व्हॅक्सीनची पहिली बॅच दिल्लीला पोहचली आहे.

‘कोविशील्ड’ लसीची पहिली बॅच मंगळवारी पहाटे ‘सीरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडिया’हून पुणे विमानतळासाठी रवाना झाली. येथून व्हॅक्सीन घेऊन पहिल्या विमानाने दिल्लीसाठी उड्डाण घेतले. लस पाठवण्याशी संबंधीत असलेल्या एका सूत्राने सांगितले की, तापमान नियंत्रित तीन ट्रक हे व्हॅक्सीन घेऊन पहाटे पाच वाजताच्या अगोदर पुणे विमानतळासाठी सीरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडियातून रवाना झाले.

 

 

 

 

 

 

 

 

पुणे विमानतळाकडून ट्विट करण्यात आले, निघण्यासाठी तयार, भारतासोबत उभे आहोत. व्हायरसला नष्ट करणारी लस देशभरात पोहचवण्यासाठी विमानात ठेवली जात आहे.

प्रत्येक बॉक्सचे वजन 32 किलोग्रॅम
पुणे विमानतळावरून ही लस हवाई मार्गाने भारताच्या अन्य भागात पोहचवली जाईल. लस इन्स्टीट्यूटमधून रवाना करण्यापूर्वी एक पूजा सुद्धा करण्यात आली होती. सूत्रांनी सांगितले की, ट्रकमध्ये 478 बॉक्स होते आणि प्रत्येकाचे वजन 32 किलोग्रॅम आहे.

महामारीने त्रस्त असलेल्या भारतासाठी व्हॅक्सीन एखाद्या सोन्यापेक्षा कमी नाही, यामुळे त्याची सुरक्षा सुद्धा कडेकोट होती. व्हॅक्सीन लोडेड तीन ट्रकची सिक्युरिटी एखाद्या झेड प्लस सुरक्षेपेक्षा कमी नव्हती. ट्रकच्या मागे-पुढे पोलिस गाड्या होत्या.

व्हॅक्सीनच्या सुरक्षेसाठी अशी घेतली जाणार काळजी

* कंपन्या, लॉजिस्टिक्स फर्म, सरकार आणि सर्व हॉस्पीटल याची चोरी रोखण्यासाठी फुलप्रूफ प्लॅन करत आहेत.

* लसीच्या नावावर ब्लॅकमार्केटिंग आणि फसवणूक टाळण्यासाठी तयारी.

* लॉजिस्टिक्स आणि ट्रान्सपोर्टेशन कंपन्या संपूर्ण सुरक्षेच्या दृष्टीने वेगाने काम करत आहेत, कारण येथूनच व्हॅक्सीनची नक्कल केली जाऊ शकते.

* मर्यादित साठ्यामुळे चोरी किंवा दुरुपयोग टाळण्यासाठी सिस्टम तयार करण्यासाठी राज्य, जिल्हा आणि ब्लॉक-स्तरीय टास्क फोर्समध्ये ड्रग कंट्रोलर कार्यालयाचा एक प्रतिनिधी असावा अशी मागणी आहे.

* गोडाऊनमध्ये व्हॅक्सीनसाठी सीसीटीव्ही, मॅन्युअल सर्च आणि अ‍ॅक्सेससाठी फिंगरप्रिंटचा वापर करण्याशिवाय योजना आहे की, ऑटोमेटड लॉगर्स लावले जातील जेणेकरून तापमानावर सतत देखरेख ठेवता येईल. हे दर तीन सेकंदाला सेंट्रल युनिटला संदेश पाठवेल.