आता देशाच्या दुर्गम भागात लवकरच ड्रोनद्वारे कोरोना व्हॅक्सीन पोहचवणार सरकार

नवी दिल्ली : देशात कोरोना व्हायरस संसर्गाची प्रकरणे आता लागोपाठ कमी होत आहेत. या दरम्यान देशात मोठ्या स्तरावर व्हॅक्सीनेशन (Coronavirus vaccine) अभियान सुरू आहे. हे लसीकरण अभियान सरकार आता दुर्गम भागात सहज पोहचवण्याच्या योजनेवर काम करत आहे. या अंतर्गत आता सरकार देशाच्या त्या दुर्गम भागात अनमँड एरियल व्हेईकल म्हणजे ड्रोन द्वारे कोरोना व्हायरसची व्हॅक्सीन (Coronavirus vaccine) पोहचवण्याची योजना आखत आहे, जेथील रस्ते दुर्गम आहेत किंवा पोहचणे कठिण आहे.
आयआयटी कानपुरने केलेल्या शोधात हे शक्य असल्याचे म्हटले आहे.

सध्या देशात सरकारसाठी कोरोना व्हॅक्सीन खरेदी करण्याचे काम सरकारनी कंपनी एचएलएल लाईफकेयर करत आहे.
तिची सहायक कंपनी एचएलएल इन्फ्रा टेक सर्व्हिसेस लिमिटेडने इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च कडून देशाच्या दुर्गम भागात कोरोना व्हॅक्सीन पोहचवण्यासाठी 11 जूनला निविदा मागवल्या आहेत.
आता केवळ तेलंगनाच ड्रोनद्वारे कोरोना व्हॅक्सीन पोहचवण्याच्या आयडियावर काम करत होते.

दुर्गम भागात कोरोना व्हॅक्सीन पोहचवणार्‍या ड्रोनबाबत आयसीएमआरने सुद्धा संपूर्ण अभ्यास केला आहे.
या अंतर्गत या कामासाठी त्या ड्रोनचा वापर होईल, जे 35 किलोमीटर पर्यंत जाऊ शकतील.
सोबतच 100 मीटरच्या उंचीपर्यंत उड्डाण घेऊ शकतात.
न्यूज 18 ने दावा केला आहे की यासंबंधीच्या कागदपत्राची त्यांच्याकडे कॉपी असून, यात म्हटले आहे की 22 जून पर्यंत यासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत.

कागदपत्रांमध्ये या गोष्टीचा उल्लेख आहे की, आयसीएमआरने आयआयटी-कानपुर सोबत मिळून याबाबत एक संशोधन केले आहे.
ड्रोनद्वारे देशातील दुर्गम भागात कोरोनास व्हॅक्सीन पोहचवता येऊ शकते का, याबाबतची आयसीएमआरची ही चाचणी यशस्वी ठरली आहे.

यासाठी स्टँडर्ड प्रोटोकॉलसह अशा ड्रोनचे मॉडलसुद्धा तयार करण्याचे काम सुरू आहे. हे ड्रोन 4 किलो वजन वाहून नेण्यास सक्षम असतील.
शिवाय व्हॅक्सीन ठरलेल्या सेंटरवर पोहचवून ते परत आपल्या स्टेशनवर येईल. यात पॅराशूट अधारित डिलिव्हरी सिस्टम नसेल.

कोरोना संकटात सापडलेल्या 50 मुलांची ‘आई’ बनली महिला पोलीस रेहाना शेख

 

वजन कमी करण्यासाठी ‘हे’ खाऊ नका

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Web Titel :  Coronavirus vaccine | indian govt soon fky uav drones to deliver coronavirus vaccines to remote areas bids invited covid 19

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा