Coronavirus Vaccine : ‘कोविशिल्ड’च्या 2 डोसमधील अंतर वाढवण्याच्या कारणाला ‘टंचाई’ असं म्हणणं अत्यंत ‘दुर्देवी’ !

पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लसीकरण मोहीम अधिक वेगवान करण्यात येत आहे. १ मे पासून देशात १८ वर्षांवरील सर्वांच्याच लसीकरणाला मंजुरी दिली अन देशात लसीकरणाला वेग आला. मात्र काही दिवसातच लसी अभावी याला ब्रेक लागला आहे. त्यातच आता कोविशिल्डच्या दुसऱ्या मात्रेसाठीचे अंतर १२ ते १६ आठवडे एवढे निर्धारित करण्यात आले आहे. तत्पूर्वी ४० दिवसांचा कालावधी निर्धारित करण्यात आला होता. हा कालावधी वाढवून लस अधिक प्रभावी ठरत असल्याचा तर्क देण्यात आला आहे. मात्र दुसरीकडे दोन डोसमधील अंतर वाढवण्यामागे लसींचा तुटवडा असल्याची चर्चा आहे. मात्र हि चर्चा दुर्दैवी असल्याचे नीति आयोगाचे सदस्य व्ही.के. पॉल यांनी म्हटलं आहे.

व्ही.के.पॉल म्हणाले, काही दिवसापूर्वी कोविशिल्डच्या दोन डोसमधील अंतर १२ ते १६ आठवडयांनी वाढवण्यात आले. वैज्ञानिक दृष्ट्या आधारित हा निर्णय आहे. जो काही डेटा समोर आला त्यावरून वैज्ञानिक आधारावरच दोन डोसांमधील अंतर वाढवण्यात आले. मात्र अनेकांकडून याबद्दल वेगळीच चर्चा सुरु आहे. लसींच्या कमतरतेमुळे दोन डोसमधील अंतर वाढवण्यात आलं असे म्हणणे हे अतिशय दुर्देवी आणि खेदजनक आहे.

गेल्या आठवड्यात लसीच्या प्रभावाबद्दलचा डेटा पाहण्यात आला. आता पर्यंत ६२ ते ८५ टक्क्यांपर्यंत प्रभाव दिसून आला तर ट्रान्समिशनमध्येही घट दिसून आली. रिकव्हरी रेटमध्येही ३ मेपासून वाढ झाली. पाच दिवसांमध्ये रिकव्हरी केसेसमध्ये सक्रिय केसेस अधिक आहेत. दहा राज्यांमध्ये ७५ टक्के केसेस आहेत. तर १२ राज्यामध्ये ८० टक्के सक्रिय केसेस आहेत. तर गेल्या पाच दिवसात पॉझिटिव्ह रेटही २० टक्क्यांच्या खाली गेला आहे. ११ राज्यांत १ लाखांपेक्षा अधिक सक्रिय केसेस आहेत, तर ५० हजार ते १ लाख सक्रिय केसेस ८ राज्यांत आणि ५० हजारांपेक्षा कमी सक्रिय केसेस १७ राज्यांत आहेत,अशी त्यांनी स्पष्ट केले.