‘कोरोना’ व्हायरसच्या वॅक्सीनबद्दल ‘एस्ट्राजेनेका’नं दिली खुशखबर, परीक्षणात मिळालेल्या परिणामांमुळं संशोधक आनंदित

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसने जगात रोज हजारो लोकांचा मृत्यू होत आहे, परंतु अजूनपर्यंत त्यावर नियंत्रण मिळवण्याची पद्धत समोर आलेली नाही. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, आता कोरोना व्हायरसचा अंत वॅक्सीनमुळे होईल, ज्यासाठी विविध देशात ट्रायल जारी आहे. या दरम्यान, औषध कंपनी एस्ट्राजेनेकाने कोरोना व्हायरस वॅक्सीनबाबत खुशखबरी दिली आहे. ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीसोबत पार्टनरशिपमध्ये विकसित करण्यात येत असलेल्या एस्ट्राजेनेकाच्या वॅक्सीनने आतापर्यंतच्या ट्रायलमध्ये खुप चांगले परिणाम दिले आहेत. एस्ट्राजेनेकाने म्हटले की, कोविड-19 वॅक्सीनच्या ट्रायलमध्ये त्यांना आतापर्यंत खुप चांगला डेटा मिळाला आहे.

जगात आतापर्यंत एकाही कोरोना व्हायरस वॅक्सीनला मंजूरी मिळालेली नाही, पण वॅक्सीन बनवण्याच्या रेसमध्ये आतापर्यंत एस्ट्राजेनेकाची वॅक्सीन सर्वात पुढे असल्याचे मानले जात आहे. कारण हिचे सुरूवातीच्या ह्यूमन ट्रायलचे चांगले परिणाम समोर आले होते आणि ही पूर्णपणे सेफ आणि इम्यून रिस्पॉन्स डेव्हलप करणारी असल्याचे दिसून आले आहे. या वॅक्सीनच्या तिसर्‍या टप्प्यातील ह्यूमन ट्रायल जारी आहे.

मुख्य कार्यकारी पास्कल सोरियट यांनी गुरूवारी मीडियाशी बोलताना म्हटले की, वॅक्सीन बनवण्याचे काम चांगल्याप्रकारे प्रगती करत आहे. वॅक्सीनच्या परीक्षणबाबत आमच्याकडे आतापर्यंतचा चांगला डाटा आहे. आम्हाला क्लिनिकल ट्रायलमध्ये प्रभाव दाखवण्याची गरज आहे, पण आतापर्यंतचा विचार केल्यास खुप चांगले परिणाम दिसून आले आहेत.

एस्ट्राजेनेका ब्रिटनची सर्वात व्हॅल्यूएबल लिस्टेड कंपनी आहे. तिने अगोदरच आपल्या अंडर ट्रायल कोविड-19 वॅक्सीनचे 2 बिलियनपेक्षा जास्त डोस बनवण्यासाठी अनेक देशांसोबत सौदा केला आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, या वर्षीच्या अखेरीस त्यांच्या वॅक्सीनला मंजूरी मिळेल.