अखेर केव्हा मिळणार चांगली बातमी ? Johnson And Johnson नं थांबवलं कोरोना वॅक्सीनचं ट्रायल, जाणून घ्या कारण

नवी दिल्ली : जगभरात कोरोना महामारीदरम्यान कोरोना व्हायरसची वॅक्सीन बनवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अशावेळी एक धक्कादायक बातमी आहे की, जॉन्सन अँड जॉन्सने आपल्या कोरोना वॅक्सीनची ट्रायल थांबवली आहे. ट्रायलमध्ये सहभागी झालेल्या एका व्यक्तीमध्ये कोणता तरी आजार झाल्यानंतर जॉन्सन अँड जॉन्सने सध्या आपली कोरोना वॅक्सीन ट्रायल थांबवली आहे.

न्यू जर्सी कंपनीचे न्यू ब्रंसविक प्रवक्ता जेक सरजेंट यांनी हेल्थ केयर न्यूज देणारी एजन्सी स्टॅटचा रिपोर्ट योग्य असल्याचे सांगितले आणि म्हटले की जॉन्सन अँड जॉन्सनची सुरू असलेली कोरोना वॅक्सीनची ट्रायल थांबवली आहे.

या महिन्याच्या सुरूवातीला जॉन्सन अँड जॉन्सन अमेरिकेत वॅक्सीन बनवणार्‍या शॉर्ट लिस्टमध्ये सहभागी झाली आहे. कंपनीची एडी26-सीओव्ही2-एस वॅक्सीन अमेरिकेत चौथी अशी वॅक्सीन आहे, जी क्लिनिकल ट्रायलच्या अंतिम टप्प्यात आहे. मागच्यावेळी रिपोर्टमध्ये म्हटले होते की, वॅक्सीनने सुरूवातीच्या अभ्यासात कोरोना व्हायरसविरूद्ध एक मजबूत प्रतिकार शक्ती बनवली आहे. संशोधकांनी म्हटले होते की, आतापर्यंतच्या चाचणीच्या आधारावर कोणतेही गंभीर दुष्परिणाम नव्हते.

जॉन्सन अँड जॉन्सनने जेव्हा या वॅक्सीनच्या अंतिम टप्प्यातील चाचणी सुरू केली होती, तेव्हा कंपनीने म्हटले होते की, या अंतर्गत अमेरिका, दक्षिण अफ्रीका, ब्राझील, चिली, कोलंबिया, मेक्सिको आणि पेरूमध्ये 60 हजार लोकांवर वॅक्सीनची चाचणी करण्यात येईल. जॉन्सन अँड जॉन्सच्या ट्रायलवर प्रतिबंध लावल्याची बातमी अशावेळी आली आहे, जेव्हा यापूर्वी एस्ट्राजेनेकाच्या वॅकसीनवर प्रतिबंध लावण्यात आला होता.

वॅक्सीन बनवण्याच्या रेसमध्ये ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि एस्ट्राजेनेकाची वॅक्सीन सर्वात पुढे होती, पण मागील दिवसात काही वॉलंटियरची कोविशील्ड लस घेतल्यानंतर प्रकृती बिघडल्याने तिसर्‍या टप्प्यातील चाचणी 6 सप्टेंबरला थांबवली होती. मात्र, ब्रिटन आणि भारतात पुन्हा चाचणी सुरू झाली आहे. तर, अमेरिका किंवा अन्य देशांनी अजून दुसर्‍यांदा मंजूरी दिलेली नाही.