Corona Vaccine | आता 12 वर्षाखालील बालकांसाठीही कोरोना लस, ट्रायल सुरु

न्यूयॉर्क : वृत्त संस्था – जगभरात थैमान घातलेल्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान बालकां (Child) ना धोका असल्याबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे 12 वर्षाखालील बालकांचा कोरोनापासून बचाव करण्यासाठी लस विकसित केली आहे. फायजर कंपनीने (Pfizer ) याची चाचणी सुरू केली असून यात अमेरिका, फिनलँड, पोलंड आणि स्पेन आदी देशांचा समावेश आहे. या चाचणीत 4500 हून अधिक बालकां(Child) चा समावेश केला आहे.

अमेरिकेत 5 ते 11 वयोगटातील मुलांच्या फायझर (Pfizer) कोरोना प्रतिबंधक लस चाचणीला सोमवारी सुरुवात झाली. यावेळी रसेल ब्राइट या 7 वर्षांच्या मुलाने ही चाचणी लस घेतली. न्यू ऑर्लिअन्स येथील ऑचसनर वैद्यकीय केंद्रात चाचणी पार पाडली. यावेळी मुले खेळण्यांशी खेळताना दिसली, तर काही रडत होती. या मुलांच्या शरीराचे तापमान अन् रक्तदाब तपासण्यात आला. तपासणीसाठी रक्तही घेतले.

त्यानंतर अखेर त्यांना चाचणी लस दिली.
10 मे रोजी 12 ते 15 वयोगटातील मुलांना फायझर लस देण्यास परवानगी दिली आहे.
रसेलबरेबर ॲडम ब्राइट यांचा 5 वर्षांचा लहान मुलगा टकर हासुद्धा या चाचणी प्रक्रियेत सहभागी झाला आहे.
चाचणीचा एक भाग होण्याची ही संधी फायदेशीर होती, असे ॲडम यांनी सांगितले.
चाचणीत मुलांना 10 मायक्रोग्रॅमचे दोन डोस देण्यात येणार असल्याचे कंपनीने याआधीच स्पष्ट केले होते.
हे प्रमाण किशोरवयीन आणि वयस्करांसाठी दिल्या जाणा-या डोसच्या एक तृतीयांश इतके आहे. काही आठवड्यानंतर 6 महिन्यावरील मुलांवरील लस चाचणीस सुरुवात केली जाणार आहे.

हे देखील वाचा

Weather Alert | कोकणात ढगफुटीचा इशारा

Shirur News | अतिक्रमणाचा ताबा देणेसाठी चक्क नायब तहसिलदारांने बनवली बनावट कागदपत्रे? शिरूर तहसिल कार्यालयातील धक्कादायक प्रकार

Pune Crime News | दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या 4 जणांच्या टोळीला खडक पोलिसांकडून अटक