US : 3 माजी अध्यक्ष TV वर Live घेतील ‘कोरोना’ लशीचा ‘डोस’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   अखेर ती वेळ आली आहे जेव्हा कोरोनाची लस लोकांपर्यंत पोहोचेल. ब्रिटनमध्ये येत्या काही दिवसांत सर्वसाधारण लोकांना लस मिळू लागेल. ब्रिटन सरकारने दिग्गज कंपनी फायझरची लस वापरण्यास मान्यता दिली आहे. तसेच अमेरिकेच्या तीन माजी राष्ट्रपतींनी असा निर्णय घेतला आहे की, ते कॅमेऱ्यासमोर कोरोना लस लावतील.

दरम्यान, फायझरसह काही कंपन्यांनी जरी कोरोना लशीच्या यशाचा दावा केला असेल आणि ते लवकरच सर्वसाधारण लोकांपर्यंत पोहोचतील. परंतु जगातील बर्‍याच देशांमध्ये कोरोना लशीबद्दल लोकांमध्ये भीती आहे. या भीतीवर मात करण्यासाठी अमेरिकेचे तीन माजी अध्यक्ष बराक ओबामा, जॉर्ज डब्ल्यू बुश आणि बिल क्लिंटन यांनी ही लस एकत्र घेण्याचा निर्णय घेतला आहे.

सीएनएनच्या एका अहवालानुसार अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा म्हणाले की, त्यांना अमेरिकन डॉक्टर अँथनी फॉसी यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. त्यांनीच मला सांगितले आहे की ही लस सुरक्षित आहे. म्हणून मी या लशीचा डोस घेणार आहे. ते म्हणाले की, मी ही लस टीव्हीवर लाइव्ह लावू शकतो किंवा याची रेकॉर्डिंग केली जाऊ शकते.

तीन पूर्व राष्ट्रपति लगवाएंगे वैक्सीन

माजी अध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू बुश यांचे चीफ ऑफ स्टाफ फ्रेडी फोर्ड यांनी सांगितले की, त्यांनी डॉ. फॉसी आणि व्हाईट हाऊसच्या टीमशी चर्चा केली आहे. असे सांगितले गेले आहे की बुशसुद्धा लोकांच्या मनातला संशय दूर करण्यासाठी आनंदाने कॅमेर्‍यासमोर या लशीचा डोस घेतील. याव्यतिरिक्त अमेरिकेचे अजून एक माजी अध्यक्ष बिल क्लिंटनचे प्रवक्ते अँजेल उरेना म्हणाले की, आरोग्य अधिकाऱ्यांच्या प्राथमिकतेच्या आधारे माजी राष्ट्राध्यक्ष क्लिंटन नक्कीच कोरोना लस घेतील. ते म्हणाले की तेही ही लस जाहीरपणे घेऊ शकतात.

रिपोर्ट्सनुसार, नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणात अमेरिकेत कोरोना विषाणूच्या लशीबाबत बरीच भीती निर्माण झाली आहे. एवढेच नाही तर जगातील बर्‍याच देशांमधील लोकदेखील कोरोना लशीचा डोस घेण्याबाबत भीती बाळगून आहेत.