Coronavirus : ‘वॅक्सीन’ आल्यानंतरही 2021 पर्यंत लोकांना घालावा लागेल ‘मास्क’, अमेरिकेचे तज्ञ डॉ. फॉसी यांनी सांगितलं

वॉशिंग्टन : वृत्त संस्था – अमेरिकेचे मुख्य संसर्गजन्य रोग तज्ज्ञ डॉ. अँथनी फाउची यांचे म्हणणे आहे की, वॅक्सीन उपलब्ध झाल्यानंतर सुद्धा पुढील वर्षापर्यंत लोकांना मास्क घालावा लागेल. फाउची यांनी म्हटले की, केवळ वॅक्सीनद्वारे 2021 पर्यंत कोरोनावर नियंत्रण मिळवता येऊ शकत नाही.

डॉ. फाउची यांनी म्हटले की, आपल्याला वॅक्सीनसोबतच सोशल डिस्टन्सिंग, हातांची स्वच्छता आणि मास्कचा उपयोग सुरूच ठेवावा लागेल. असे करूनच आपण कोरोना व्हायरसचा स्तर खुप खाली आणू शकतो, ज्यामुळे महामारी नष्ट होईल.

फाउची यांचे हे सुद्धा म्हणणे आहे की, पहिली कोरोना वॅक्सीन इतकी प्रभावी नसेल जी लोकांना शंभर टक्के कोरोना व्हायरसपासून वाचवू शकेल. ते म्हणाले, बहुतेक वॅक्सीन लोकांसाठी 70 टक्केपर्यंत सुरक्षित सिद्ध होईल. यापूर्वी एक्सपर्टनी हे सुद्धा सांगितले आहे की, जर ट्रायलच्या दरम्यान वॅक्सीन 50 टक्के लोकांसाठी प्रभावी राहिली तरच तिला मंजूरी मिळू शकते.

फाउची यांनी म्हटले की, अशी कोणतीही वस्तू नाही, जी आपल्या बळावर कोरोना व्हायरसला पूर्णपणे नष्ट करू शकते. यासाठी एकाच वेळी अनेक गोष्टींचा वापर करणे आवश्यक आहे. जगभरात यावेळी सुमारे 30 वॅक्सीन अशा आहेत, ज्यांची टेस्ट मनुष्यावर केली जात आहे. अमेरिकेत 4 वॅक्सीन ट्रायलच्या शेवटच्या टप्प्यात पोहचल्या आहेत.

अमेरिकेत एस्ट्रेजेनका, मॉडर्ना, फायझर आणि जॉन्सन अँड जॉन्सनची वॅक्सीन ट्रायलच्या अखेरच्या राऊंडमध्ये पोहचली आहे. एस्ट्रेजेनका, मॉडर्ना आणि फायझरची वॅक्सीन जर यशस्वी ठरली तर लोकांना या वॅक्सीनचे दोन डोस देण्याची गरज असेल. तर, जॉन्सन अँड जॉन्सनच्या वॅक्सीनचा एकच डोसच प्रभावी ठरू शकतो.