Corona Vaccine : वॅक्सीनला मंजूरी मिळाल्यानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन, म्हणाले – ‘आत्मनिर्भर भारताच्या दिशेने आणखी एक पाऊल’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गेल्या वर्षभरापासून कोरोना विषाणूने संपूर्ण जगभरात थैमान घातले आहे. या साथीच्या आजाराविरोधात अनेक देशातील शास्त्रज्ञ लसींवर युद्धपातळीवर काम करत आहेत. यात भारतानेही मुख्य भूमिका बजावली आहे. या सुरु असलेल्या युद्धादरम्यान, ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (डीसीजीआय) सीरम संस्था आणि भारत बायोटेक लसीच्या आपत्कालीन वापरास मान्यता दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याला एका उत्साही लढाईचा टर्निंग पॉईंट म्हणून वर्णन करत म्हटले की, प्रत्येक भारतीयाला अभिमान असेल कि, आपत्कालीन परिस्थितीसाठी वापरल्या जाणार्‍या दोन लसी भारतात बनविल्या आहेत.

पंतप्रधान मोदींनी या शास्त्रज्ञांचे कौतुक करत म्हटले की, आमच्या वैज्ञानिक समुदायानेही आत्मनिर्भर भारताची भावना दर्शविली आहे. यात मुळात काळजी आणि करुणा आहे. त्यांनी या लसीच्या तातडीच्या वापरास दिलेल्या मान्यतेस एक साहसी युद्धाचा टर्निंग पॉईंट म्हंटले आहे. पंतप्रधान म्हणाले की, डीसीजेआयने सीरम संस्था आणि भारत बायोटेकच्या लसीला मान्यता दिल्यानंतर कोरोना मुक्त व निरोगी भारताचा मार्ग प्रशस्त होईल. पंतप्रधानांनी यासाठी देश, कठोर परिश्रमांबद्दल वैज्ञानिक आणि अन्वेषकांचेही अभिनंदन केले आहे. सीरम संस्थेच्या अदार पूनावाला यांनी ट्वीट करून नवीन वर्षाचे अभिनंदन करत म्हंटले की, सीरम संस्था लसीच्या साठवणुकीसह सर्व जोखीम घेत आहे. कोविशिल्ट, भारताची पहिली कोरोना लस मंजूर झाली आहे. ही सुरक्षित आणि प्रभावी आहे.

महत्त्वाचे म्हणजे 1 जानेवारी रोजी एसईसीने डीसीजीआयला कोव्हीशिल्ट आणि कोव्हॅक्साईनच्या आपत्कालीन वापरास परवानगी देण्याची शिफारस केली. डीसीजेआयच्या म्हणण्यानुसार दोन्ही लसींचे दोन डोस इंजेक्शनने द्यायचे आहेत. भारतात बनवलेल्या या दोन्ही लस 2 ते 8 डिग्री तापमानात सुरक्षित असतील.