Corona Vaccine : 18 वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्यांसाठी ‘या’ तारखेपासून Online नोंदणी सुरु

पोलीसनामा ऑनलाईन टीम – कोरोना संकटाच्या पार्शवभूमीवर १८ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना लसीकरण देण्याची प्रक्रिया १ मे पासून सुरु होणार आहे. आता यासंदर्भात एक मोठे अपडेट मिळाले आहे. वास्तविक, लस नोंदणी शनिवारपासून (२४ एप्रिल) सुरु होईल. ज्यांना लस घेण्याची इच्छा आहे ते CoWin पोर्टलला भेट देऊन नोंदणी करू शकतात.

कोरोना लसीकरण मोहिमेचा तिसरा टप्पा पुढील महिन्यांपासून भारतात सुरु होत आहे. केंद्र सरकारने या संदर्भात १९ एप्रिल रोजी मार्गदर्शक तत्वे जारी केले. त्याअंतर्गत, लस उत्पादक दरमहा जारी केलेल्या डोसपैकी ५०% डोस केंद्र सरकारला पुरवतील. त्याचबरोबर उर्वरित ५०% पुरवठा राज्य सरकार, खासगी रुग्णालये आणि खुल्या बाजारात विकण्यासाठी त्यांना परवानगी असेल.

यापूर्वी, ४५ वर्षांपेक्षा जास्त लोक कोरोना लस घेऊ शकत होते, तथापि कोरोनाची वाढती प्रकरणे आणि लसीच्या मागणीमुळे केंद्र सरकारने नियमात शिथिलता आणली आहे.

वॅक्सीनसाठी SII ने किंमत जाहीर केली
भारतात सध्या दोन लसी बनवल्या जात आहेत. यात सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या कोविशील्ड आणि भारत बायोटेकच्या कोवॅक्सीन यांचा समावेश आहे. तथापि, सरकारने रशियाची कोरोना लस स्पूतनिक-V ला मंजुरी दिली असून, त्याची प्रक्रिया लवकरच सुरु होईल.

बुधवारी SII ने लसींच्या नवीन किंमती जाहीर केल्या आहेत. त्याअंतर्गत, राज्य सरकारला कोविशील्ड प्रति डोस ४०० रुपये खरेदी करता येणार आहे. खासगी रुग्णालये हे ६०० रुपयांमध्ये खरेदी करू शकते. त्याचबरोबर केंद्र सरकारला निश्चित असलेला दर १५० रुपये ठेवण्यात आला आहे.

भारतात वाढत आहेत कोरोना प्रकरणे
भारतात कोरोना संसर्गाची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. गेल्या २४ तासांत संसर्गाची ३ लाखांहून अधिक नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत. त्याचबरोबर या महामारीमुळे २१०४ लोकांचा मृत्यू मागील २४ तासात झाला आहे.