रशियाच्या राष्ट्रपतींनी मोठ्या स्तरावर ‘कोरोना’च्या लसीकरण अभियान सुरू करण्याचे दिले आदेश

मॉस्को : रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी पुढील आठवड्यात मोठ्या प्रमाणात कोरोना लसीकरण अभियान सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. रशियाने स्पूतनिक-व्ही कोरोना व्हॅक्सीन बनवली आहे. रशियाचे म्हणणे आहे की, स्पूतनिक व्ही खुप सुरक्षित आहे.

पुतिन म्हणाले, स्पूतनिक व्ही व्हॅक्सीनचे 20 लाखांपेक्षा जास्त डोस तयार करण्यात आले आहेत. त्यांनी आज अधिकार्‍यांना निर्देश दिले की, पुढील आठवड्यात लसीकरणासंबंधी सर्व तयारी पूर्ण करा.

आजच ब्रिटनने फायजर-बायोएनटेकच्या कोविड-19 व्हॅक्सीनला मंजूरी दिली आहे. अशावेळी आता लवकरच ब्रिटनमध्ये सर्वसामान्य लोकांना कोरोना व्हॅक्सीन दिली जाईल. ब्रिटनची औषध आणि आरोग्य उत्पादन नियामक एजन्सीने सांगितले की, व्हॅक्सीन वापरात आणण्यासाठी सुरक्षित आहे.

अमेरिकेन औषध कंपनी फायजर आणि जर्मन कंपनी बायोएनटेकने एकत्रितपणे ही व्हॅक्सीन विकसित केली आहे. कंपनीने नुकताच दावा केला होता की, परीक्षणाच्या दरम्यान त्यांची लस सर्व वयाच्या, वंश, विविध ठिकाणच्या लोकांवर परिणामकारक ठरली आहे.

प्रधानमंत्री बोरिस जॉन्सन यांनी या आनंददायी बातमीचे स्वागत केले आहे आणि यास दुजोरा दिला आहे की, पुढील आठवड्यात व्हॅक्सीन उपलब्ध करण्यास सुरूवात होईल. जॉन्सन सुद्धा कोरोना व्हायरस संक्रमित झाले होते. त्यांनी म्हटले, व्हॅक्सीनमुळे आपल्याला जीव वाचवण्यात मदत होईल आणि अर्थव्यवस्था पुन्हा पुढे जाईल.

You might also like