चिंताजनक ! अमेरिकेत ‘कोरोना’ लसीचे दुष्परिणाम; ‘सीडीसी’ने दिल्या महत्त्वाच्या सूचना

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   कोरोनाने थैमान घातलेल्या अमेरिकेमध्ये आपातकालीन वापरासाठी फायझर-बायोएनटेक व मॉर्डना या दोन कंपन्यांच्या लसींना परवानगी दिल्यानंतर लसीकरणही सुरू झाले आहे. मात्र लसीकरण सुरू असतानाच चिंतेत भर घालणारी घटना समोर आली. कोरोना लस घेतलेल्या दोन आरोग्य कर्मचाऱ्यांवर लसीचे दुष्परिणाम दिसून आले आहेत. अमेरिकेतील अलास्का राज्यात ही घटना घडली आहे. त्यामुळे अमेरिकेच्या सेंटर्स फॉर डिजीज कंट्रोल अ‍ॅण्ड प्रीव्हेंशनने (रोग प्रतिबंधक व नियंत्रण केंद्र) तातडीने पावल उचत महत्वाच्या सूचना जारी केल्या आहेत.

लस घेतल्यानंतर कर्मचा-यांना अ‍ॅलर्जीसारखा त्रास जाणवू लागला आहे. लसीकरणामुळे दुष्परिणाम झाल्याचे निर्दशनास आल्यानंतर अमेरिकेच्या रोग प्रतिबंध व नियंत्रण केंद्रानं (सीडीएस) तात्काळ मार्गदर्शक सूचना जारी केल्या. लस घेतल्यानंतर दुष्परिणाम झालेल्या व अ‍ॅलर्जीचा त्रास असणाऱ्या नागरिकांना लस घ्यावयाच्या खबरदारी बद्दल सीडीसीने सूचना दिल्या आहेत. ज्या व्यक्तींना लसीचा पहिला डोस घेतल्यामुळे त्रास सुरू झाला आहे. त्यांनी लसीचा दुसरा डोस घेऊ नये, असं सीडीएसने स्पष्ट केले आहे. ज्या व्यक्तींना लसीमुळे अ‍ॅलर्जी होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो, त्यांना लसीकरणापासून दूर ठेवण्याचे निर्देश सीडीएसने दिले आहेत.

मॉर्डना लसीच्या आपातकालीन वापरासाठी परवानगी दिल्यानंतर शनिवारपासून लसीकरणाला सुरूवात झाली. त्याचबरोबर सोमवारी 3 हजार 700 ठिकाणी लसीचे डोस उपलब्ध होणार आहेत. मॉर्डनाच्या लसी आधी फायझर बायोएनटेकच्या लसीला 11 डिसेंबर रोजी परवानगी दिली होती.