Coronavirus : आईकडून मुलीला झाला कोविड-19, देशातील पहिले प्रकरण पुण्यातून आले समोर

पुणे : महाराष्ट्रातील पुणे शहरातून पहिले प्रकरण समोर आले आहे, ज्यामध्ये एका नवजात मुलीला तिच्या आईकडून कोविड-19 चा संसर्ग झाला आहे. या पहिल्या प्रकरणाची माहिती बीजे मेडिकल कॉलेज (बीजेएमसी) आणि ससून जनरल हॉस्पिटल (एसजीएच) ने दिली आहे.

मात्र, आई आरटी-पीसीआर टेस्टमध्ये कोरोना व्हायरस संक्रमित आढळलेली नाही. परंतु नवजात मुलगी कोविड-19 ने संक्रमित आढळली आहे. डॉक्टरांचे म्हणणे आहे की, ही देशातील पहिली अशी केस आहे, ज्यामध्ये गरोदर महिलेकडून तिच्या भ्रूणापर्यंत व्हायरस पोहचला आहे. यासाठी याबाबत सविस्तर सांगितले जाईल आणि मेडिकल जनरलमध्ये प्रकाशित करण्यात येईल.

अधिकार्‍यांचे म्हणणे आहे की, मुलीवर तीन आठवड्यापर्यंत उपचार सुरू होते आणि ती एकदम ठिक झाली आहे. मुलीला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. माहितीनुसार 22 वर्षांच्या गरोदर महिलेने 27 मे रोजी मुलीला जन्म दिला होता. डिलिव्हरीच्या एक दिवस अगोदर महिलेला ताप आला आणि थकवा जाणवू लागला. त्यावेळी असे समजले गेले की, गरोदर असल्याने तिला असे झाले असेल.

याबाबत माहिती देताना बीजेएमसी आणि एसजीएचच्या बालरोग विभागाच्या प्रमुख डॉक्टर आरती किरीकर यांनी म्हटले, आईची कोविड टेस्ट करण्यात आली होती आणि आरटी-पीसीआर टेस्ट निगेटिव्ह आली होती. परंतु मुलीत तापासारखी लक्षणे दिसू लागली. नंतर मुलीचे नासोफेरींजल स्वॅब, प्लेसेंटा आणि गर्भनाळ तपासणीसाठी पाठवण्यात आली, यामध्ये कोविड-19 चा संसर्ग आढळून आला.

डॉक्टरांनी सांगितले की, असे अनेक प्रकार चीनमध्ये समोर आले आहेत आणि एक प्रकरण ब्रिटनमध्ये सुद्धा समोर आले होते. कारण आईची कोरोना व्हायरस टेस्ट निगेटिव्ह आली होती, तर मुलीला तिच्याकडून इन्फेक्शन झालेले नाही. ते म्हणाले, महिलेचे चार आठवड्यानंतर जेव्हा आम्ही अँटीबॉडी टेस्ट केली तेव्हा कोविड-19 संक्रमणाची काही लक्षणे आढळली होती. असे होऊ शकते की ती व्हायरसमधून स्वताच बरी झाली असेल. हे प्रकरण आमच्यासाठी खुप आव्हानात्मक होते. मुलीला कोविड-19 पासून बरे करणासाठी खुप प्रयत्न करावे लागले.

बीजेएमसी आणि एसजीएचचे डीन डॉक्टर मुरलीधर तांबे म्हणाले, हे व्हर्टिकल ट्रानसमिशनचे देशातील पहिले प्रकरण आहे. हॉस्पिटलचे तज्ज्ञ हे शोधण्यात यशस्वी झाले आहेत आणि मुलीवर यशस्वी उपचार सुद्धा करण्यात आले.