Coronavirus : 1 रूग्ण 59 हजारांमध्ये पसरवू शकतो ‘कोरोना’ म्हणून लोकांपासून दूर राहणं गरजेचं

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – एका अनुभवी डॉक्टरने सांगितले की, जर कोरोना व्हायरसची लागण एका व्यक्तीला झाली असेल तर त्यामुळे 59,000 लोकांना कोरोना व्हायरसची लागण होऊ शकते. युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनच्या इंटेसिव्ह केअर मेडिसिनचे प्राध्यापक डॉ. ह्यू. मॉन्टेगोमरी यांनी सांगितले की, कोरोना व्हायरस हा अत्यंत संसर्गजन्य व्हायरस आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एका मुलाखतीमध्ये डॉ. व्ह्यू यांनी सविस्तरपणे समजावले की, कशा प्रकारे एक संक्रमित व्यक्तीपासून हजारो लोकांना या व्हायसची लागण होऊ शकते. त्यांनी लोकांना एकमेकांमध्ये अंतर ठेवण्याचे आवाहन देखील केले आहे.

ह्यू यांनी सांगितले की, सामान्य फ्लू झाल्यास ते सरासरी 1.3 ते 1.4 लोकांना संक्रमित करतात. फ्लू दरम्यान, पुढील संक्रमित व्यक्ती इतर लोकांना देखील संक्रमित करते आणि जर संसर्ग चक्र 10 वेळा असेच चालू राहिले तर संसर्ग होण्याची 14 प्रकरणे आढळतील.

ह्यू यांनी फ्लूशी कोरोना व्हायरसची तुलना केली आणि धोक्याविषयी इशारा दिला. ते म्हणाले की, कोरोना व्हायरस एका व्यक्तीपासून साधारणत: अंदाजे 3 लोकांमध्ये पसरतो.

ह्यू म्हणाले की, कोरोना व्हायरसची लागण एक ते तीन लोकांना होऊ शकते आणि जर ती 10 थरांमध्ये वाढत गेली तर 59,000 लोकांना याचा संसर्ग होण्याचा धोका आहे. उदाहरणार्थ, 1 ते 3, 3 ते 9, 9 ते 27, 27 ते 81, 81 ते 243, 243 ते 729, 729 ते 2187, 2187 ते 6561, 6561 ते 19683, 19683 ते 59,049 अशाप्रकारे लोकांना संसर्ग होऊ शकतो.

ह्यू म्हणाले की, ज्यांना कोरोना व्हायरसचा संसर्ग होतो त्यातील काही टक्के लोक आजारी पडतात तर काही लोकांना आयसीयूमध्ये ठेवण्याची आवश्यक असते. तथापि, जे आजारी पडत नाहीत त्यांनादेखील संसर्ग होऊ शकतो आणि हा व्हायरस इतरांपर्यंत पसरु शकतो.

जगभरात कोरोना व्हायरसची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. त्याचबरोबर, भारतात आतापर्यंत 566 पुष्टी झालेल्या प्रकरणे आढळले आहेत. यामध्ये 11 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 46 लोक बरे झाले आहेत.