व्हिटॅमिन-D मुळं खरंच ‘कोरोना’पासून बचाव होतो का ? तज्ज्ञांनी दिली ‘ही’ नवीन माहिती

आधी झालेल्या एका संशोधनामध्ये व्हिटॅमिन डीमुळं कोरोनापासून बचाव करता येतो अशी माहिती समोर आली होती. परंतु आता मात्र ब्रिटनमध्ये आरोग्य अधिकारी आणि आरोग्य तज्ज्ञांनी केलेल्या संशोधनातून आता नवीन माहिती समोर आली आहे. व्हिटॅमिन डी मुळं कोरोनाचा धोका कमी होत नाही असं आता समोर आलं आहे. ब्रिटनच्या नॅशनल इंस्टीट्युट फॉर हेल्थ अँड केअर एक्सेलेंसनं (NICE) याबाबत संशोधन केलं आहे.

या संशोधनात व्हिटामीन डी आणि कोरोना व्हायरस यांच्यातील संबंधांचा अभ्यास करण्यात आला होता. या संशोधनातून असे दिसून आले की, व्हिटामीन डी च्या सप्लिमेंट्सनी कोरोनापासून बचाव होऊ शकतो याबाबत कोणतेही पुरावे आढळलेले नाहीत. NICE मधील सेंटर गाईडलाईन्सचे प्रमुख पॉल क्रिस्प यांनी सांगितले की, व्हिटामीन डी चे आरोग्याला अनेक फायदे आहेत. परंतु व्हिटामीन डी मुळे कोरोनापासून बचाव होतो. याबाबत कोणतेही पुरावे मिळाले आहेत.

लंडनच्या इंपेरियल कॉलेज ऑफ इम्युनोलॉजीचे प्रोफेसर चार्ल्स यांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकांनी व्हिटॅमिन डीच्या सप्लीमेंट्स घेतल्यास नुकसानदायी ठरू शकतं. त्यापेक्षा व्हिटॅमिन डी असलेल्या पदार्थांचे आहारात सेवन करायला हवं. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय व्हिटॅमिन डीच्या टॅब्लेट्सचे सेवन करू नये.

जर शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता निर्माण झाली तर ताप येणं, थकवा, हाडं आणि पाठीत वेदना होणं, मानसिक ताण, केस गळणं, स्नायूंमध्ये वेदना होणं, अशी लक्षणं जाणवतात. याशिवाय हृदयाचे ठोके वाढण्याची समस्याही उद्भवते. जर तुम्ही आहारात काही पदार्थांचं सेवन केलं तर व्हिटॅमिन डीची कमतरता भरूनही काढता येते.

व्हिटॅमिन डीची कमतरता भरून काढण्यासाठी काय करावं ?

– जर तुम्ही नियमित पनीरचं सेवन केलं तरीही तुम्ही व्हिटॅमिन डीची कमतरता भरून काढू शकता.

– दुधापेक्षा दही पचायला हलकं असतं. यामुळं दह्याच्या सेवनानं पचनाच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते.

– सोया मिल्कच्या सेवानानं देखील शरीराला व्हिटॅमिन डी मिळतं. यात अनेक पोषक घटक असतात. सोया मिल्कमध्ये आयर्न अन् प्रोटीन मोठ्या प्रमाणात असतात.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. कारण काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.