Coronavirus : सध्याच्या स्थितीत ‘असं’ करा पाहुण्यांचं स्वागत, ‘बिग बीं’नी शेअर केला ‘कॉमेडी’ व्हिडीओ !

पोलीसनामा ऑनलाईन : बॉलिवूडचे मेगास्टार बिग बी अमिताभ बच्चन सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. कधी त्यांनी एखादी पोस्ट शेअर केली आणि जर ती व्हायरल झाली नाही तरच नवल. बिग बी पुन्हा एकदा एका व्हिडीओमुळं चर्चेत आले आहेत. हा एक फनी व्हिडीओ आहे. कोरनाशी संपर्क जोडून हा व्हिडीओ तयार करण्यात आला आहे. सध्या हा व्हिडीओ सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे.

व्हिडीओत दिसत आहे की, घरात एक पाहुणी येते आणि घरातील लोक एका काठीच्या मदतीनं तिच्याकडील पिशवी घेतात. यानंतर त्याच्यावर साबणाचं पाणी टाकलं जातात. फरशी साफ करण्याच्या मोठ्या ब्रशनं तिच्या अंगाची साफसफाई करतात. चक्क ती बाहेरून येणारी मुलगी फरशीवर घराच्या बाहेरच झोपते. हा खूपच कॉमेडी व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ बिग बींना खूप आवडला. त्यामुळं त्यांनी त्यांच्या ट्विटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. तुम्हालाही व्हिडीओ पाहून हसू आवरणार नाही.

बिग बींचे चाहते या ट्विटवर प्रतिक्रिया देत आहेत. यानंतर अनेक चाहत्यांनी इतरही कॉमेडी व्हिडीओ शेअर केले आहेत आणि त्यांना टॅग केलं आहे. काही चाहत्यांनी मीम्सही शेअर केले आहेत. सध्या बिग बींचं हे ट्विट खूप व्हायरल होताना दिसत आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like