Coronavirus : पालकांना ‘कोरोना’बद्दल ‘या’ गोष्टी माहिती असायलचा हव्यात ! लाखोंच्या मनात आहेत ‘हे’ प्रश्न, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   कोरोनाचा कहर रोजच वाढत आहे. अशात लोाकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. युनिसेफनं यातील काही प्रश्नांची उत्तर दिली आहेत. याबद्दल माहिती घेऊयात.

नोवेल कोरोना व्हायरस काय आहे ?

नोवेल कोरोना व्हायरस हे एका व्हायरसचं नाव आहे. याची लागण झाली तर रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. याची सुरूवात चीनच्या वुहान शहरातून झाली आहे. याची लक्षणं सर्दीप्रमाणेच आहेत.

कसा पसरतो हा व्हायरस ?

थेट कोरोनाग्रस्ताच्या संपर्कात आल्यानंही याची लागण होते. शिंक किंवा खोकल्याद्वारे याचं संक्रमण होतं. बाधित व्यक्तीचा स्पर्श झाल्यानं किंवा त्यानं वापरपलेल्या वस्तू वापरल्यानं किंवा त्यांना स्पर्श केल्यानंही याची लागण होते.

कोरोना व्हायरसची लक्षणं काय आहेत ?

बाधित व्यक्तीला आधी ताप, खोकला किंवा श्वास घेण्यास त्रास होतो. याची लागण झाली तर काही लोक चक्कर येऊन पडतात. सर्दी-खोकल्यासारखीच याची लक्षणं आहेत. म्हणूनच याची लागण झाली की नाही हे ओळखणंही थोडं कठिण जातं.

कसा करू शकतो यापासून बचाव ?

– हात नियमित साबणानं धुणं किंवा सॅनिटायजरचा वापर करणं.
– तोंडला मास्क लावणं
– खोकताना किंवा शिंकताना रूमाल वापरणं किंवा तोंड कव्हर करणं
– रूमालाचा एकदा वापर झाला की तो फेकायला हवा किंवा स्वच्छ करायला हवा
– सर्दी किंवा खोकला असलेल्या व्यक्तीच्या जास्त जवळ जाणं टाळावं.
– लहान मुलांना, सर्दी, खोकला, ताप, श्वास घेण्यास समस्या असेल तर वेळीच डॉक्टरांशी संपर्क साधावा.

लहान मुलं किंवा गर्भवती महिलांना याची लागण होते का ?

सध्या तरी यासंर्दभाता काही ठाम माहिती सांगता येणार नाही. परंतु लहान मुलांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. गर्भवती महिलांना संक्रमणाची स्थिती डॉक्टर लवकरच सांगतील. दोघांनाही सुरक्षित ठेवण्यासाठी काळजी घ्यायला हवी आणि मास्क वापरायला हवं.

लहान मुलांमधील याची लक्षणं कशी ओळखाल ?

लहान मुलांना, सर्दी, खोकला, ताप, श्वास घेण्यास समस्या असेल तर वेळीच डॉक्टरांशी संपर्क साधावा. याची लक्षणं ही सामान्य आजारासारखीच आहेत. त्यामुळं व्हायरल जरी झाला तरी लगेच डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. याशिवाय त्यांनीही सतत मास्क वापरायला हवा.

फोर्ब्सच्या रिपोर्टमध्ये मास्क गरजेचा नाही

जर तुम्हाला इंफेक्शन झालं नसेल तर मास्क लावणं गरजेचं नाही असं फोर्ब्सच्या रिपोर्टमध्ये स्पष्ट करण्यात आलं होतं. युनिव्हर्सिटी ऑफ आयोवा कॉलेज ऑफ मेडिसिनमधील मेडिसिन आणि महामारी विज्ञानाच्या प्रोफेसर एली प्रेन्सेविक यांच्यानुसार, तुम्ही मास्क वापरण्याची गरज नाही. त्यांनी सांगितलं की, जर तुम्ही निरोगी असाल तर तुम्ही एन 95 मास्क वापरण्याची गरज नाही. कारण निरोगी लोक मास्क वापरून कोरोनापासून बचाव करू शकतात याचा कोणताही पुरावा समोर आलेला नाही. याउलट लोक चुकीच्या पद्धतीनं मास्क लावतात आणि सतत त्याला हातही लावतात. यामुळं धोका आणखीच वाढू शकतो. म्हणून तुम्ही आजारी असाल तरच मास्क वापरा.