‘या’ WhatsApp नंबरवर पाठवा Hi, ‘कोरोना’बद्दल मिळेल खरीखुरी अन् महत्वाची माहिती, PM मोदींनी देखील शेअर केलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जस जसा कोरोना व्हायरस वाढत आहे , तस तसे लोकांमध्ये अनेक माहिती देखील वाढत आहे. प्रत्येक जण वेगवेगळी माहिती घेऊन समोर येत आहे. म्हणून लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. केवळ अचूक माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचा भारत सरकार प्रयत्न करीत आहे आणि त्यांनी कोणत्याही प्रकारे घाबरू नये. हेल्पलाईन क्रमांक सरकारने आधीच जारी केले आहेत. आता सरकारने व्हॉट्सअ‍ॅप नंबरही जारी केला आहे. यावर, आपण कोरोना विषाणूशी संबंधित प्रत्येक अचूक माहिती मिळवू शकता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील हा नंबर शेअर केला आहे. आणि म्हंटले आहे की खरी माहिती गोळा करा, चुकीच्या माहितीपासून सावध रहा.

कोरोना हेल्प व्हाट्स ऍप नंबर 9013151515 वर Hi असे लिहून पाठवल्यानंतर तुम्ही कोरोना संदर्भात प्रत्येक माहिती मिळवू शकता. Hi लिहून पाठवल्यानंतर तुम्हाला मेसेज येईल. ‘नमस्ते हे भारत सरकार कोरोना व्हायरस (COVID-19) हेल्प डेस्क याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि आपण आणि आपल्या कुटुंबास सुरक्षित ठेवण्यास मदत करण्यासाठी आहे.’

या संदेशामध्ये एक हेल्पलाइन नंबर आणि टोल-फ्री नंबर देखील आहे. एक ईमेल आयडी देखील प्रदान केला आहे. यानंतर, आपण कोरोनाशी संबंधित कोणतीही माहिती घेऊ शकता त्याकरिता A,B,C,D,E,F असे पर्याय आहेत. कोरोनो व्हायरस म्हणजे काय आणि त्याची लक्षणे कोणती आहेत? कोरोना विषाणूचा प्रसार कसा होतो? कोरोना विषाणूचा धोका कमी कसा करावा? इत्यादी.

म्हणून जेव्हा जेव्हा आपल्याला कोरोनाशी संबंधित कोणतीही माहिती हवी असेल किंवा आपल्याला याबद्दल काही कंफ्यूजन असेल तर आपण या व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावर मेसेज करून त्वरित आपली शंका दूर करु शकता.

ट्विटर ने देखील COVID-19 ऑफिशियल इंर्फोमेशन नावाचे एक विशेष पेज लॉन्च केले आहे. त्यावर कोरोना विषाणूबद्दल प्रमाणित माहिती आढळू शकते.