Coronavirus : हातावर ‘होम क्वारंटाईन’चा शिक्का असताना देखील ‘उद्योग’ केल्यानं तिघे ‘गोत्यात’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी संपूर्ण देश लॉकडाऊन करण्याची घोषणा केली . होम क्वारंटाइन असणाऱ्या व्यक्तींना देखील घरातून बाहेर न पाडण्याचे आदेश दिले असताना देखील काही जण मात्र ‘आपलं तेच खरं’ अशा पवित्र्यात असल्याचे एका प्रकरणावरून दिसून आले. दुबईवरून परत आलेल्या तिघांना होम क्वारंटाइन केले असताना त्यांनी प्रशासनाला न कळवता मित्राच्या घरी ठाण मांडल्यामुळे पोलिसांनी या तिघांवर कायदेशीर कारवाई केली आहे.

होम क्वारंटाइन असताना गाठले मित्राचे घर

पोर्ट झोनच्या पोलीस उपायुक्त डॉ. रश्मी करंदीकर यांनी याबाबत अधिक माहिती दिली, त्यांनी सांगितले की , २० मार्च रोजी सकाळी ६ वाजता दुबईतून ३ भारतीय विमानाने भारतात आले होते. यापैकी दोन जण दुबई येथे प्लंबर आणि इलेक्ट्रिशियनचे काम करीत असून दुसरा इसम हा दुबईमध्ये राहत असलेल्या भावास भेटण्यासाठी गेला होता. तिघांची मुंबई विमानतळावर वैद्यकीय तपासणी करून त्यांना होम क्वारंटाइनचा शिक्का मारण्यात आला होता आणि त्यांची तात्पुरती सोय साकीनाका, अंधेरी व गोरेगाव येथे करण्यात आली होती. तसेच त्यांनाा मूळ गाव झारखंड येथे जाण्यासाठी शासकीय यंत्रणेमार्फत व्यवस्थाही करण्यात आली होती. मात्र, या त्रिकूटाने शासकीय यंत्रणेला न कळविता वडाळा येथे भाड्याने राहत असलेल्या मित्राकडे २२ मार्च रोजी पहाटे दोन वाजता धाव घेतली. त्याबाबत त्यांनी महानगरपालिका किंवा पोलीस यंत्रणेस कळविले नाही.

मंगळवारी याबाबत वडाळा पोलिसांना समजताच तिघांना ताब्यात घेत त्यांची वैद्यकीय तपासणी केली. त्यांना ३ एप्रिलपर्यंत होम क्वारंटाइन करत पवई येथे पाठविण्यात आले आहे. तसेच तिघांवर शासकीय यंत्रणेचे आदेश न पाळल्यामुळे कायदेशीर कारवाई करण्यात आल्याचे