Coronavirus : ‘कोरोना’विरूध्दच्या लढाईत गृहमंत्री अमित शहा कुठं आहेत, मास्टर प्लॅन काय ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  कोरोनाच्या वाढत्या प्रभावाला रोखण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात २१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली.कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी तसेच देशहितासाठी हा निर्णय त्यांनी घेतला आहे.देशभरातील पोलीस प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा जोमाने कामाला लागल्या आहे.रस्त्यावर पोलीस आहेत, तर रुग्णालयात डॉक्टर्स, नर्स आणि वैद्यकीय कर्मचारी आपली कोरोनाच्या विरोधातील लढाई लढताना दिसत आहे.देशातील सर्व राज्याचे मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री सातत्याने बैठक घेत आहेत.तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन हे सुद्धा परिस्थितीवर नियंत्रण ठेऊन आहे.दरम्यान,याच काळात देशाचे गृहमंत्री अमित शहा कोठेही दिसत नसल्याची खंत नेटिझन्सने व्यक्त केली आहे. त्यामुळे ट्विटरवर #WhereIsAmitShah असा ट्रेंड आज दिवसाच्या सुरुवातीलाच दिसून आला.

देशात शुक्रवारी कोरोना संसर्गाने चौघांचा मृत्यू झाल्याने मरण पावलेल्यांची संख्या २० वर पोहचली आहे.तर संसर्गित रुग्णांची संख्या ८७३ झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव्ह अग्रवाल यांनी सांगिल्यानुसार,गेल्या २४ तासांमध्ये ७५ नवीन रुग्ण आढळले आहे.एकीकडे देशात लॉकडाऊन सोबत तपासाला गती दिली जात असताना, संसर्गित रुग्णांची संख्या वाढत आहे.केरळ मध्ये शुक्रवारी ३९ तर मुंबई मध्ये ९ नवीन संसर्गित रुग्ण आढळले. जम्मू-काश्मीर मध्ये देखील ४ जणांना संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले.देशातील कोरोना संसर्गित रुग्णांची वाढती असताना परिस्थिती हाताळण्यासाठी गृहमंत्री अमित शहा यांचा काहीही सहभाग नसल्याचे नेटिझन्सने म्हटले.

देश गेल्या ७० वर्षातील सर्वात मोठ्या समस्येला सामोरे जात आहे. मात्र देशातील अंतर्गत सुरक्षेच्या मुद्द्यावर लक्ष ठेवण्याकरीता किंवा त्याविषयी बोलण्याकरीता

गृहमंत्री कोठेही दिसत नाही.तसे कोरोना विरोधात लढण्यासाठी त्यांचा मास्टरप्लॅन सुद्धा दिसत नसल्याने, सोशल मीडियाच्या माध्यमातून नेटिझन्स कडून ट्विटर वर #WhereIsAmitShah असा ट्रेंड पाहायला मिळाला.

अमित शाह त्यांच्या ट्विटर अकॉउंटवरून सक्रिय आहे.ते पंतप्रधान आणि पीएमओ कार्यालयाचे ट्विट देखील रिट्विट करून fight_against_corona च्या लढाईत दिसून येत आहे. मात्र मीडिया आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून ते व्यक्तिगतपणे जनतेसमोर आले नाही.त्यामुळेच नेटिझन्सने ट्विटर वर अमित शहा कुठे आहे? असा प्रश्न विचारला.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like