तबलिगी ‘जमात’चे मौलाना साद दिल्लीतच ‘या’ परिसरात क्वारंटाईन ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीतील निझामुद्दीन भागात तबलिगी जमात मरकज प्रकरण उघडकीस आल्यानंतर संपूर्ण देशात खळबळ उडाली. तबलिगी मधून बाहेर पडेलेल्या लोकांमुळे देशात कोरोना रुग्णांच्या संख्यात वाढ झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. दरम्यान, मरकजचा मौलाना साद फरार झाला. पोलीस त्याचा शेध घेत असून सादचा ठावठिकाणी लागला असल्याची माहिती मिळत आहे. मौलाना साद हा सद्या त्याच्या दिल्लीच्या झाकीर नगर भागातील निवासस्थानी क्वारंटाईन असल्याच समजतेय.

दरम्यान, आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवाडीनुसार देशातील कोरोनाबाधितांची संख्या 5 हजार 194 वर पोहचली आहे. यामध्ये 70 परदेशी नागरिकांचा समावेश आहे. तर 149 जणांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. तसेच 402 जणांवर उपचार यशस्वी झाल्याचे दिसून येत आहे. कोरोनाबाधितांमध्ये मरकज येथे हजर असलेल्या लोकांची संख्या सर्वाधिक असल्याचे समोर आले आहे.

मरकज प्रकरण समोर आल्यानंतर मौलाना सादसहीत सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील सर्व सात आरोपी सध्या फरार आहेत. पोलिसांनी मौलाना सादला शोधू काढण्यासाठी उत्तर प्रदेशच्या शामलीपासून दिल्लीत अनेक ठिकाणी छापे टाकले. दरम्यान, गुन्हे शाखेने मौलाना साद याला नोटीस पाठवून त्याच्याकडे 26 प्रश्नांची उत्तरे मागितीली होती. मात्र, आपण सध्या क्वारंटाईनमध्ये असून नंतर उत्तरे देईन असे साद याने म्हटले होते. त्यानंतर गुन्हे शाखेने दुसरी नोटीस साद याला पाठवली आहे.