Coronavirus : मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी केलं तरूण सरपंच ऋतुराज देशमुखांचं कौतुक, ऋतुराजनं केलं कोरोनामुक्त गाव

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  राज्यातील कोरोना(corona) रुग्णांची संख्या दिवसेंदिवस घटत आहे. कोरोना(corona) परिस्थितीचा आढावा घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी (दि. 30) राज्यातील जनतेशी संवाद साधला. या संवादावेळी मुख्यमंत्री कोरोनामुक्त गावाची संकल्पना मांडत राज्यातील 3 सरपंचांचे कौतुक केले. मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, हिवरेबाजारचे पोपटराव पवार, घाटणे गावचा सरपंच ऋतुराज देशमुख, कोमल करपे यांनी त्यांची गाव कोरोनामुक्त केली. या तरूण मुलांच्या कामाच कौतुक आहे. मी लवकरच तिघांशी बोलणार आहे. मी जस तुमच्याशी बोलतोय तस या तिघांनाही तुमच्याशी बोलायला सांगणार आहे. कोरोनामुक्त गाव ही संकल्पना आपल्याला राबवायची आहे. महाराष्ट्र देशाला दिशा दाखवतो. गाव कोरोनामुक्त झाल्यावर राज्य कोरोनामुक्त होईल, महाराष्ट्राचा आदर्श देशाने घेतला तर देश कोरोनामुक्त होईल असा विश्वास मुख्यमंत्री ठाकरेंनी व्यक्त केला आहे.

मराठा आरक्षणावरून शिवसेनेची गर्जना ! ‘दिल्लीत पुन्हा संयुक्त महाराष्ट्र लढ्याचा माहोल करावा लागेल’

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे, प्रत्येक गावाने कोरोनामुक्त व्हायच ठरवल तर ही लाट थोपवू शकता. माझ कुटुंब माझी जबाबदारी, मी जबाबदार अशा मोहिमा राबवल्या त्याला चांगल यश मिळाल. प्रत्येकान ठरवल मी माझ गाव कोरोनामुक्त करायच तर नक्कीच करू शकतो. सगळ्यांनी ठरवल माझ घर कोरोनामुक्त, वस्ती कोरोनामुक्त, गाव कोरोनामुक्त, तालुका

कोरोनामुक्त सगळ राज्य कोरोनामुक्त व्हायला वेळ लागणार नाही.

बी पॉझिटिव्ह अन् गाव ठेवू कोरोना निगेटिव्ह

सोलापूर जिल्ह्यातील घाटणे गाव कोरोनामुक्त करण्यात युवा सरपंच ऋतुराज देशमुख यशस्वी ठरलेत. सर्वात युवा सरपंच म्हणून निवडून आलेला हा ऋतुराज देशमुख राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे. सरपंच म्हणून जबाबदारी सांभाळताना त्याने गाव कोरोनामुक्त करण्यासाठी ग्रामस्थांना सोबत घेऊन बी पॉझिटिव्ह आपला गाव ठेवू कोरोना निगेटिव्ह ही मोहीम हाती घेतली. ऋतुराजच्या या मोहिमेला ग्रामस्थांचा प्रतिसाद लाभला आणि गाव कोरोनामुक्त झाले. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला गावातील कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत होते. गावात 2 मृत्यू झाल्यानंतर गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण होते. त्यानंतर गावाला कोरोनामुक्त करण्यासाठी ऋतुराजने रुग्णांचा शोध, तपासणी, उपचार, लसीकरण, नियमांचे काटेकोरपणे पालन या पंचसूत्रीचा वापर केला. गावातील जे ग्रामस्थ शहरात जातात किंवा जनसंपर्क अधिक असलेले व्यवसाय करतात अशा ग्रामस्थांसाठी आवश्यकतेनुसार रॅपिड अ‍ॅन्टिजेन टेस्टिंग सुरू केली. तसेच गावातील 45 वर्षावरील ग्रामस्थांचे लसीकरण करून घेणे, आशा वर्कर्सच्या मदतीने वेळोवेळी गावकऱ्यांची ऑक्सिजन लेव्हल, तपासून घेणे, गावातील प्रत्येक कुटुंबाला व्हिटॅमिनच्या गोळ्या, सॅनिटायझर, मास्क, साबण आदीचा समावेश असलेले कोरोना सेफ्टी कीट देणे अशा विविध उपाययोजनांवर भर दिला आहे. गावात विलिगीकरण कक्ष आणि मिनी कोविड सेंटर सुरू करून सर्व आवश्यक गोष्टींच्या उपलब्धतेबाबत ऋतुराजने विशेष लक्ष पुरविल अन् गाव कोरोनामुक्त केले.

 

 

World No Tobacco Day : कॅन्सरच नव्हे, तंबाखू खाण्याने होतात इतरही जीवघेणे आजार

Pune : आईस्क्रीम घेण्यास गेलेल्या 19 वर्षीय तरूणीसोबत 61 वर्षाच्या दुकान मालकानं केले अश्लील चाळे, पुण्यामधील कोथरूडच्या कर्वेनगर भागातील घटना

Central Vista Project : सुरू राहील प्रकल्पाचे काम, दिल्ली HC ने याचिका फेटाळली; याचिकाकर्त्याला 1 लाखाचा दंड