Coronavirus | चिंता कायम ! …तोपर्यंत कोरोना संकट रहाणारच; ‘WHO’ चा इशारा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Coronavirus | मागील दिड वर्षापासून कोरोनाच्या महामारीने अनेक लोकांना हतबल करुन सोडलं आहे. कोरोनाच्या धोकादायक विषाणूने (Coronavirus) अनेकांचा जीव गेला आहे. कोरोनाची परिस्थिती थोपावण्यासाठी सरकार तरी अनेक उपाय योजना करीत आहेत. ”पुन्हा कोरोना नको, पुन्हा लाॅकडाऊन नको” या आशेने लोकांची भावना दिसते. मात्र, अशातच आता जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) एक महत्वपुर्ण माहिती दिली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीवरुन अजुनही कोरोनाचं संकट असल्याचं चित्र दिसतं आहे. त्यामुळे आता चिंतेत भर पडली आहे.

कोरोना माहामारी अजून संपली नसून, कोरोना विषाणु संसर्गाला पुढचे काही दिवस माहामारीच्या श्रेणीमध्येच ठेवण्यात येणार आहे.
म्हणून कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी येत्या काळामध्ये अनेक दिवस कोरोना प्रतिबंधक नियमांची काळजी घ्यावी लागणार आहे.
त्यातचं कोरोनाचे नवीन व्हेरियंट चिंता वाढवणारे ठरत आहेत.
अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेनं
दिली आहे. त्याचबरोबर कोरोनाच्या या लढाईत लसीकरण (Vaccination) अत्यंत महत्वाचे असल्याने लसीकरणामुळेच कोरोना महामारीचा प्रभाव कमी होऊन मृत्यूची संख्या कमी होईल.
असं WHO कडून सांगण्यात आले आहे.

कोरोना विषाणूचा उगम झालेल्या चीनमध्ये (China corona virus) देखील आता कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंटचे रुग्ण सापडले आहेत.
तसेच, चीनच्या फुजियान प्रांतातील (Fujian Province) झियामेन शहरात कोरोनाचे रुग्ण आढळ्यानंतर शहरात कडक लॉकडाऊन लागू केला आहे.
दरम्यान, समुद्र किनारपट्टीवर असणाऱ्या या शहरात पर्यटनासाठी असलेल्या हॉटेल, बार, सिनेमागृह, जीम आणि वाचनालयं बंद करण्यात आली आहेत.
अशी माहिती तेथील प्रशासनाने पत्रकार परिषदेतून दिली आहे.

 

Web Title : Coronavirus | who said the covid19 virus was in the epidemic category

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Shiv Bhojan Thali | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवभोजन थाळी मोफतच मिळणार

Gold Price Today | लागोपाठ 6 व्या दिवशी स्वस्त झालं सोनं, आता 27718 रुपयात मिळतंय 10 ग्रॅम, जाणून घ्या नवीन दर

23 वर्षीय शेजारीण माझ्या पतीला ‘अंडरगारमेंट्स’ दाखवते, 42 वर्षीय महिलेने पोलिसांकडे ‘ही’ मागणी; अधिकारी हैराण