Coronavirus : मास्क कोणासाठी गरजेचं, नेमकी काय घ्यावी दक्षता ? वाचा प्रत्येक आवश्यक उत्तर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसचे रूग्ण देशात वाढत चालले आहेत आणि सरकारपासून तज्ज्ञ, आणि प्रत्येकजण काळजी घेण्याचे आवाहन करत आहेत. गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सध्या लोकांमध्ये एक शंका आहे की, या व्हायरसपासून बचाव करण्यासाठी मास्क लावणे जरूरी आहे का? प्रत्येकाने मास्क लावला पहिजे का ? आता या शंका दूर करण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने माहिती दिली आहे. मास्क कुणी लावावा…

प्रश्न : मास्क केव्हा लावावा ?
प्रत्येकोन मास्क घालण्याची गरज नाही, मास्क तेव्हाच लावा…
जेव्हा तुमच्यामध्ये काही संसर्ग असेल (खोकला, ताप किंवा श्वास घेण्याय त्रास)

तुम्ही कोरोना व्हायरसने पीडित किंवा संशयित रूग्णाची देखभाल करत असाल. (नर्स किंवा कुटुंबातील सदस्य)

तुम्ही अशा ठिकाणी आहात जेथे कोरोना पीडित व्यक्त आहे.

मास्क लावताना कोणती काळजी घ्यावी ?
मास्क अनफोल्ड करा, लक्षात ठेवा दोन्ही भाग एकमेकांपासून वेगळे असावेत.

मास्क असा लावा की तुमचे तोंड, नाक झाकले जाईल. मास्कमध्ये अंतर असू नये.

वापरत असताना मास्कला स्पर्श करू नका.

मास्क आपल्या गळ्यात लटकवू नका.

जर मास्क ओला झाला तर तो 6 तासांच्या आत बदला.

वापरलेला मास्क पुन्हा वापरू नका. वापरलेला मास्क नेहमी बंद डस्टबीनमध्ये टाका.

मास्क काढताना शरीराच्या दुसर्‍या भागाला स्पर्श करू नका.

मास्क काढल्यानंतर हात साबण आणि पाण्याने स्वच्छ करा. किंवा अल्कोहोलच्या सॅनिटायझरने स्वच्छ करा.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोना व्हायरसबाबत नवीन हेल्पलाइन सुद्धा जारी केली आहे. नवीन हेल्पलाइन 1075 वर 24 तास संपर्काची सुविधा आहे. यापूर्वी मंत्रालयाने 011-23978046 नंबर सुद्धा जारी केला होता. याशिवाय [email protected] वर ई-मेल करू शकता.