Coronavirus : ‘कोरोना’ इटलीमध्ये बनलंय ‘महामारी’, मृत्यूचा दर जगापेक्षा ‘दुप्पट’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चीननंतर आता कोरोनाने हात पसरले आहेत. जगभरातील अनेक देश कोरोनामुळे बेहाल झाले आहेत. परंतु कोरोनाचे सर्वात मोठे सावट इटलीमध्ये असल्याचे दिसत आहे. इटलीमध्ये यावेळी 10,149 लोक व्हायरसमुळे संक्रमित झाले आहेत. तर येथे मृतांचा आकाडा 631 वर पोहोचला आहे. म्हणजे चीननंतर सर्वात जास्त कोरोनाचे बळी इटलीमध्ये आहेत. यामुळे इटलीचे रस्ते, मॉल, हॉटेल – रेस्टॉरंट ओस पडले आहेत. माणसांऐवजी रस्त्यांवर कबुतरे जास्त दिसत आहेत.

जगभरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 117,751 वर पोहोचली आहे. या व्हायरसने 4292 लोकांचा जीव घेतला आहे. म्हणजेच कोरोनामुळे एकूण 3.64 टक्के लोक मारले गेले आहेत. इटलीत ही संख्या दुप्पट आहे. इटलीमध्ये संक्रमित रुग्णांची संख्या 10,149 आहे. तर 631 लोकांचा मृत्यू झाला आहे. एकूण संक्रमित लोकांची संख्या 6.21 टक्के आहे.

चीनमध्ये 80,778 लोक संक्रमित आहेत. 3158 लोकांचा मृत्यू झाला आहे. म्हणजेच संक्रमित मृतांची संख्या 3.90 टक्के आहे. इटलीतील कोरोना मुळे मृतांच्या संख्येचा दर चीनमधील मृतांच्या संख्येपेक्षा दुप्पट आहे.

एका वृत्तानुसार कोरोनामुळे मरणाऱ्यांची संख्या जास्त असल्याचे कारण तेथील वृद्धांची जास्त संख्या आहे. या देशात युरोपच्या बाकी देशांच्या तुलनेत वृद्धांची संख्या जास्त आहे. येथील लोकसंख्येच्या 23 टक्के हिस्सा वृद्धांचा आहे.

इटलीमध्ये कोरोनामुळे मृत झालेल्या लोकांचे वय 80 ते 90 वर्ष आहे. वृद्धांची प्रतिकार शक्ती कमी असल्याने त्यांना या व्हायरसचा प्रदुर्भाव जास्त होतो. मिशिगन युनिव्हर्सिटीचे महामारी विषयाचे प्रोफेसर ऑब्री गॉर्डन म्हणाले, कोणत्याही देशातील महामारीचा परिणाम त्या देशातील लोकसंख्येवर अवलंबून असते. जो कोणी कमकुवत असेल त्याला हा व्हायरस प्रदुर्भाव होण्यास वेळ लागणार नाही.

इटलीच्या वृद्धांमध्ये मधुमेह, कमी प्रतिकार शक्ती याच्या जास्त समस्या आहेत. यामुळे तो कोरोनाचा सामना करु शकत नाहीत. प्रो. ऑब्री गॉर्डन यांनी सांगितले की दुसरे कारण एका छोट्या परिसरात जास्त लोक कोरोना बाधित असणे. बाधित असल्याचे प्रमाण वाढल्यात तेथील आरोग्य व्यवस्था कोलमडते.

वुहान मध्ये कोरोना व्हायरसमुळे मरणाऱ्यांची संख्या 5.8 टक्के होता. तर इटलीमध्ये ही संख्या वाढून 6.21 टक्के झाली आहे. हा या देशासाठी एक मोठा धोका आहे. तिसरे कारण आहे की इटली कोविड 19 ने बाधित लोकांची संख्येचे प्रमाण शोधण्यास उशीर होत आहे. कारण देशातील अनेक लोक कोरोनाने बाधित आहेत परंतु त्याचा परिणाम इतका कमी दिसत आहे की लोकांना याची कल्पना देखील येत नाही.