Coronavirus : धक्कादायक ! पतीचा ‘कोरोना’ रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याच्या धक्क्यामुळं पत्नीचा मृत्यू

धारूर : पोलीसनामा ऑनलाईन – पतीला कोरोना झाल्याचं आढल्यानंतर म्हणजेच पतीचा कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे हे कळाल्यानंतर या धक्क्यानं पत्नीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. सोमवारी (दि 24) पती कोरोना पॉझिटीव्ह आढळ्यानंतर आरोग्य विभाग पतीला रात्री पतीला उपचारासाठी घेऊन गेला. याच धक्क्यानं पत्नीचाही मृत्यू झाला आहे. धारूर तालुक्यातील गावंदरा येथील ही घटना आहे. विशेष म्हणजे या मृत पत्नीचा कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह आला होता.

धारूर तालुक्यातील कुसाबाई बडे (वय 58) असं या पत्नीचं नाव आहे. कुसाबाई यांच्या पतीचा स्वॅब रिपोर्ट पॉझिटीव्ह आला होता. हाच धक्का कुसाबाई यांना सहन झाला नाही. यानंतर त्या प्रचंड दु:खात आणि भीतीच्या छायेत होत्या. मंगळवारी (दि 25) घरातील इतर सदस्यांनी कुसाबाई यांना झोपेतून उठवण्याचा प्रयत्न केला. परंतु त्या मृत अवस्थेत आढळल्या. हे पाहून घरच्यांनाही धक्का बसला.

कुसाबाई यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचे कुटुंबीय आणि शेजारील लोक पतीला कोरोना झाल्याच्या धक्क्यातून व याच भीतीनं त्या जग सोडून गेल्या आहेत अशी शंका व्यक्त करत आहेत.

बडे यांच्या कुटुंबीयांची स्वॅब तपासणी केली होती. यात सर्वजण निगेटीव्ह आले आहेत. कुसाबाई बडे यांचाही स्वॅब रिपोर्ट निगेटीव्ह आला होता.