कोरोना आता आपल्यातून कधीच जाणार नाही का? जाणून घ्या तज्ञ काय सांगतात

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  देशात कोरोनाने थैमान घातले आहे. दरम्यान कोरोनाची तिसरी लाट येण्याचा इशाराही तज्ज्ञांनी दिला आहे. अशात आता आणखी एका रिसर्चने आपली सर्वाची चिंता वाढवली आहे. 117 देशातील आकड्यांच्या आधारावर केलेल्या या रिसर्चनुसार, कोरोना आता आपल्यातून कधीच जाणार नाही. कोरोनासोबतच आपल्याला जगण्याची सवय करुन घ्यावी लागणार आहे. रिसर्चमधून दावा केला आहे की, हा व्हायरस कधीच संपणार नाही, म्हणजेच तो कायम जिवंत राहणार आहे. वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार, कोरोनापासून स्वतःचा बचाव हाच एकमेव पर्याय आहे. यासाठी लसीकरणानंतरही कोरोनापासून बचावासाठी मास्क लावणे, अंतर ठेवणे, नियमित हात धुणे या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.

या रिसर्चमध्ये सांगितले आहे की, कोरोना व्हायरस वर्षातून एकदा आपल्या पीकवर असेल. यामुळे अनेकांना आपला जीवही गमावावा लागू शकतो. भारतात सध्या कोरोनाची दुसरी लाट सुरू आहे. अशातच तिसऱ्या लाटेचीही शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे लोकांनी सतर्क राहण्याची गरज आहे. जर्मनीच्या हेडलबर्ग इन्स्टिट्यूट ऑफ ग्लोबल हेल्थ आणि चायनीज अकॅडमी ऑफ मेडिकल सायन्सने कोरोना कायम जिवंत राहणार असल्याचा दावा केला आहे. रिपोर्टमध्ये विषाणू दिर्घकाळ राहाणार असल्याच्या दाव्यासोबत इतरही अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. जगातील उत्तर आणि दक्षिणेकडील देशांमध्ये कोरोनाचे थैमान जास्त असेल. सोबतच उन्हाळा, प्रचंड उष्णता किंवा थंडी, यापैकी कोणत्याही स्थितीत कोरोनाचे थैमान कमी होणार नाही. वातावरणाचा कोरोनाचा प्रभाव कमी करण्यात काहीच उपयोग होणार नसल्याचे या रिपोर्टमध्ये म्हटले आहे.