कोरोना व्हायरस कधीही संपणार नाही, उन्हाळा असो की थंडी नेहमी राहील प्रकोप, जाणून घ्या कशी भीतीदायक आहे ही स्टडी

नवी दिल्ली : वृत्त संस्था – कोरोना व्हायरसच्या प्रकोपाने सर्वत्र हाहाकार उडाला आहे. लोक कोरोना कहर थांबण्याची वाट पहात आहेत, परंतु आता जो स्टडी आला आहे, तो लोकांना हादरवणारा आहे. संशोधकांनुसार, कोरोना व्हायरस सोबत जगण्याची सवय लावून घेतली पाहिजे. एका अभ्यासात दावा करण्यात आला आहे की, हा व्हायरस कधीही नष्ट होणार नाही, म्हणजे नेहमी जिवत राहील. हा प्रकोप मोठ्या कालावधीपर्यंत जारी राहील.

मेडिकल सायन्सचे म्हणणे आहे की, कोणत्याही व्हायरसचे अस्तित्व कधीही नष्ट होत नाही, या रिसर्चमध्ये सांगण्यात आले आहे की, कोरोना व्हायरस वर्षात अनेकदा पूर्ण उच्च पातळीवर असेल. यामुळे मोठ्या संख्येने लोकांना जीव गमवावा लागेल. भारतात सध्या कोरोनाची दुसरी लाट सुरू आहे आणि तिसरीची शक्यता व्यक्त केली जात आहे.

रिपोर्ट जनरल सायंटिफिकमध्ये सुद्धा प्रकाशित
जर्मनीच्या हेडलबर्ग इन्स्टीट्यूट ऑफ ग्लोबल हेल्थ आणि चायनीज अकॅडमी ऑफ मेडिकल सायन्सने कोरोना व्हायरस आयुष्यभर जिवंत राहण्याचा दावा केला आहे. हा रिसर्च रिपोर्ट जनरल सायंटिफिकमध्ये सुद्धा प्रकाशित झाला आहे. रिपोर्टमध्ये हा व्हायरस मोठ्या प्रमाणात जिवंत राहण्यासह कोरोनाबाबत अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत.

जगाच्या उत्तर आणि दक्षिण देशांमध्ये जास्त कहर
यात म्हटले आहे की, जगाच्या उत्तर आणि दक्षिण देशांमध्ये कोरोनाचा कहर जास्त राहील. सोबतच यामध्ये असेही म्हटले आहे की, उन्हाळा असो की थंडी कोणत्याही हंगामात कोरोनाची भव्यता कमी होणार नाही. संशोधकांनी हा रिपोर्ट 117 देशांच्या आकड्यांच्या आधारावर तयार केला आहे. त्यांचे म्हणणे आहे की, कोरोनापासून बचाव हा एकमेव उपाय आहे. यासाठी आवश्यक आहे की लसीकरणानंतर सुद्धा कोरोनापासून बचावासाठी असलेल्या नियमांचे पालन करत राहीले पाहिजे.