Coronavirus Impact : पुणे आणि पिंपरी-चिंचवड मधील ‘या’ प्रकारची सर्व मद्यविक्री केंद्रे 31 मार्चपर्यंत बंद !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहर आणि परिसरात कोरोना व्हायरसचे रूग्ण आढळून येत आहेत तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरून व देशांतर्गत विमान प्रवासाद्वारे प्रवासी भारतात सर्वत्र प्रवास करीत आहेत. कोरोना अधिक मोठया प्रमाणावर पसरू नये म्हणून पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील सर्व एफएल 3 (तारांकीत हॉटेल वगळून)/ फॉर्म ई / ई-2 / एफएल 4 (कायमस्वरूपी) / एफएल 4 (तात्पुरती) मद्यविक्री केंद्रे  दि. 18 ते 31 मार्च 2020 पर्यंत संपुर्णपणे बंद राहणार आहेत. त्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी काढले आहेत.