Coronavirus : अंत्यसंस्कारानंतर जिवंत आढळली महिला, कुटूंबासह डॉक्टरांची उडाली झोप

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसशी लढणाऱ्या इक्वाडोरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली असून एका महिलेने बहिणीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. पण काही दिवसांनी तिची बहीण जिवंत असल्याचे समजले.

खरं तर, ग्वायाकिल शहरात राहणाऱ्या ७४ वर्षीय अल्बा मरूरी यांना २७ मार्च रोजी उच्च ताप आणि श्वासोच्छवासाचा त्रास होत असल्याने एबल गिलबर्ट पोंटॉन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कोरोनासारख्या लक्षणांमुळे डॉक्टरांनी त्यांना इंटेन्सिव्ह केअर युनिटमध्ये दाखल केले.

एका वृत्तसंस्थेनुसार, काही दिवसांनंतर अल्बाची बहीण ऑरा मरूरी यांना रुग्णालयातून फोन आला. रुग्णालयाच्या कर्मचार्‍यांनी त्यांना सांगितले की त्यांची बहीण अल्बा यांचा मृत्यू झाला आहे आणि तुम्ही त्यांचा मृतदेह घेऊन जा.

अल्बा मरुरी या कोरोना संशयित होत्या त्यामुळे त्यांच्या कुटूंबाला रुग्णालयाच्या कर्मचार्‍यांनी मृतदेहापासून अंतर ठेवण्याची सूचना केली, नाहीतर संपूर्ण कुटुंबाला कोरोनाची लागण होईल. म्हणून अल्बाच्या कुटुंबियांनी रुग्णालयातील कर्मचार्‍यांच्या सूचनेचे पालन केले आणि सावधगिरीने शरीरावर अंत्यसंस्कार केले.

अल्बा यांच्या मृत्यूची माहिती त्यांनी इतरांना पण दिली. काही दिवसांनंतर अल्बा यांची बहीण ऑराला रुग्णालयातून फोन आला. त्यांनी सांगितले गेले की अल्बा मरुरी यांना बोलायचे आहे. त्यांना वाटले की कोणी मस्करी करत आहे. सुरुवातीला विश्वास नाही बसला, नंतर जेव्हा तिला अल्बा यांच्या जिवंत असण्याची खबर मिळाली तेव्हा तिला धक्का बसला.

फोन कॉलच्या काही तासांनंतर, एक रूग्णवाहिका ऑरा मरुरी यांच्या घरी आली. रुग्णवाहिकेत रुग्णालयाचे कर्मचारी आणि डॉक्टर उपस्थित होते. त्यांनी अल्बा यांच्या कुटूंबाची माफी मागितली आणि सांगितले की गैरसमजांमुळे त्यांनी अल्बा यांच्या कुटूंबाकडे दुसर्‍याचा मृतदेह दिला होता.

त्याचबरोबर ऑरा म्हणाली की या घटनेनंतर तिला झोप येत नव्हती. त्यांना माहित नव्हते कि त्यांनी कोणाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. घरात अस्थी देखील ठेवली जातात. दुसरीकडे, एबल गिलबर्ट पोंटॉन हॉस्पिटलने अद्याप त्यांच्या लापरवाहीचे कोणतेही स्पष्टीकरण दिले नाही.