मी ठीक ! युवकासाठी ठेवा व्हेंटिलेडर म्हणणार्‍या 90 वर्षाच्या महिलेचा मृत्यू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोनामुळे गंभीरपणे बाधीत झालेल्या अनेक देशांमध्ये व्हेंटिलेटरची कमतरता आहे. यामध्ये इटली आणि अमेरिकेसारख्या विकसित देशांचा समावेश आहे. व्हेंटिलेटरची कमतरता आणि रूग्णांची संख्या जास्त असल्याने कोणत्या रूग्णांना व्हेंटिलेटर ठेवायचे आणि कोणत्या नाही हे ठरविणे देखील डॉक्टरांना अवघड जात आहे. अशा परिस्थितीत एका 90 वर्षाच्या महिलेने व्हेंटिलेटर लावण्यास नकार दिला आहे.

सुझान एच. नावाच्या 90 वर्षांच्या महिला बेल्जियमच्या बिन्कॉममध्ये राहत होत्या. 20 मार्च रोजी कोरोनामुळे त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण त्यांनी व्हेंटिलेटर लावण्यास नकार दिला आणि डॉक्टरांना ते (व्हेंटिलेटर) तरूणांसाठी ठेवण्यास सांगितले.

व्हेंटिलेटर लावण्यास नकार देणाऱ्या सुझान यांचा नंतर मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, डॉक्टरांना सुझान म्हणाल्या होत्या की, ‘मला कृत्रिम श्वसन यंत्र वापरायचे नाही. तरूणांसाठी ते ठेवा. मी चांगली आहे मात्र, दाखल झाल्यानंतर 2 दिवसांनी 22 मार्च रोजी त्याचा मृत्यू झाला.

जेव्हा कोरोनाच्या रूग्णांना श्वास घ्यायला त्रास होत असतो तेव्हा त्यांच्या फुफ्फुसांना व्हेंटिलेटरद्वारे ऑक्सिजन पुरविला जातो. सुझान यांची मुलगी जुडिथ म्हणाली की, ‘मी तिचा निरोप देखील घेऊ शकत नाही आणि मला तिच्या अंत्यसंस्कारात देखील सामिल होऊ शकत नाही.

बेल्जियममध्ये कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत 700 हून अधिक लोक मरण पावले आहेत. बेल्जियमची लोकसंख्या केवळ 14 दशलक्ष आहे. परंतु येथे 12 हजाराहून अधिक लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.