‘कोरोना’ प्रतिबंधासाठी 12 दिवसापूर्वीच मंजुरी, कामे प्रगतीपथावर : पालकमंत्री विजय वडेट्टीवार

चंद्रपूर : पोलीसनामा ऑनलाइन  –  चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात कोरोना प्रतिबंधासाठी अनेक उपाययोजना करण्यासाठी विविध योजनांमधून 53 कोटी 18 लक्ष 26 हजार रुपये निधी मंजूर करण्यात आला असून अनेक कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. तरीही काही लोक जनतेमध्ये गैरसमज पसरवून शासनाला बदनाम करीत आहे. मात्र कोरोनाच्या काळात नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याकरीता करोडो रुपयांची कामे युद्धपातळीवर सुरू असल्याने कोरोना आपत्तीच्या काळात जनमानसात गैरसमज निर्माण होईल, असे कोणतेही काम कोणीही करू नये, असे आवाहन मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.

कोरोना प्रतिबंधासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांमध्ये प्रामुख्याने खनिज विकास निधी मधून 17 कोटी 88 लक्ष 34 हजार, जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण मधून 20 कोटी 48 लक्ष 4 हजार, राज्य आपत्ती प्रतिसाद निधी मधून 15 कोटी 78 लक्ष 53 हजार मंजुर करण्यात आले असून त्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे ऑक्सिजन लिक्विड प्लांटला मंजुरी देऊन त्याकरिता 1 कोटी 41 लक्ष 50 हजार, सैनिकी शाळेत गॅस पाईप लाईन प्रस्थापित करण्यासाठी 60 लक्ष 68 हजार , शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 100 खाटाचे ऑक्सिजन बेड तयार करण्यासाठी 4 कोटी 48 लक्ष 55 हजार, वरोरा, राजुरा येथील रुग्णालयात ऑक्सिजन व गॅस पाईप लाईन प्रस्तावित करण्यासाठी 4 कोटी 52 लक्ष 18 हजार, चंद्रपूर येथील शासकीय महाविद्यालयात ऑक्सिजन प्लांट बसविण्यासाठी 92 लक्ष 65 हजार, जम्बो ऑक्सिजन सिलेंडर रिफिलिंग करण्यासाठी 84 लक्ष, 30 रुग्णवाहिका भाडेतत्वावर घेण्यास 40 लक्ष 50 हजार तर 6 रुग्णवाहिका खरेदी करण्यासाठी 1 कोटी 50 लक्ष वैद्यकीय महाविद्यालयास मंजुर, जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना 20 रुग्णवाहिका खरेदी करण्यासाठी 5 कोटी 60 लक्ष मंजुर, जिल्हा शल्य चिकित्सकणा 18 रुग्णवाहिका खरेदीसाठी 2 कोटी 90 लक्ष 70 हजार, जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना अँटीजन टेस्ट किट खरेदीसाठी 98 लक्ष 56 हजार, ग्रामीण रुग्णालयाकरिता औषधे, साधन सामुग्री व यंत्रसामुग्री खरेदी करण्यासाठी 1 कोटी 20 लक्ष, कोरोना बाधित रुग्णासाठी औषध खरेदीसाठी 40 कोटी 59 लक्ष, उपजिल्हा रुग्णालयाकरीता औषधे, साधनसामुग्री व यंत्रसामुग्री खरेदीसाठी 1 कोटी, कोविड रुग्णाला प्लाझ्मा आवश्यक यंत्र सामुग्री खरेदीसाठी 68 लक्ष 11 हजार, कोविड 19 रुग्णालयाकरिता आवश्यक औषध खरेदीसाठी 1 कोटी 18 लक्ष 70 हजार, व्हीआरडीएल लॅब करिता किट्स, रसायनेसह सामान प्लास्टिक व इतर सामुग्री खरेदीसाठी 5 कोटी 17 लक्ष 31 हजार, चंद्रपूर येथील स्वतंत्र महिला रुग्णालयात 100 खाटांचे ( 50 आयसीयू बेड सहित) रुग्णालय व शासकीय रुग्णालय चंद्रपूर येथे 300 खाटांचे जम्बो ऑक्सिजन सिलिंडर खरेदीसाठी 1 कोटी 89 लक्ष 37 हजार, जिल्हा सामान्य रुग्णालय येथे ऑक्सिजन निर्मिती प्लांट पुरविण्यासाठी 2 कोटी 27 लक्ष 86 हजार, उच्च दाब सिलेंडर पुनर्भरण बुस्टरचा पुरवठा स्थापना तपासणी व वापर सुरू करण्यासाठी 1 कोटी 10 लक्ष 83 हजार, कोविड रुग्णाकरिता चंद्रपूर रुग्णालय इमारतीमध्ये 50 आयसीयू खाटासाठी वाढीव गॅस पाईप लाईन व स्त्री रुग्णालयातील इतर कामासाठी 1 कोटी 3 लक्ष, 95 हजार, शासकीय सैनिक शाळा भिवकुंड येथे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मुकाबला करण्यासाठी गॅस पाईप लाईन प्रस्थापित करण्यासाठी 2 कोटी 49 लक्ष 71 हजार मंजूर करण्यात आले असून शासकीय सैनिक शाळा येथे 390 खाटांचे डीसिएचसी व 10 खाटांचे डीसिएच कार्यरत करण्यासाठी 8 कोटी 56 लक्ष 65 हजार, ग्रामीण रुग्णालय ब्रम्हपुरी व उपजिल्हा रुग्णालय वरोरा, राजुरा येथे प्रत्येकी 40 खाटांचे डीसिएचसी व 10 खाटांचे डीसिएच स्थापित करण्यासाठी 4 कोटी 86 लक्ष 56 हजार रुपयांच्या कामास तांत्रिक मंजुरी देण्यात आली आहे. अशा अनेक व्यापक आरोग्य विषयक सुविधा निर्माण करण्यास विविध योजनेतून आधीच मंजूर करण्यात आले असताना काही लोक गैरसमज पसरविण्याचे काम करीत आहेत. हे निरर्थक असल्याचे मत श्री. वडेट्टीवार यांनी व्यक्त केले आहे.

चंद्रपूर येथे सैनिकी शाळेत 400 ऑक्सिजन बेड व 25 आयसीयू बेडला मंजुरी आधीच दिली असल्याचे श्री. वडेट्टीवार यांनी सांगितले. जनतेमध्ये गैरसमज पसरविण्याचे काम कोणी करू नये असे आवाहन पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी विरोधकांना या आपत्तीच्या काळात केले आहे .