Coronavirus : भारतानं रशियाला मागे टाकल्यानंतर WHO नं दिली धोक्याची सुचना

पोलीसनामा ऑनलाइन : जगभरात रविवारी १ लाख ८० हजार रुग्णांना कोरोना संसर्गाची बाधा झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे एकूण कोरोना संसर्गित रुग्णांची संख्या १ कोटी १५ लाखांवर पोहचली आहे. तर गेल्या २४ तासांत ३६०० पेक्षा लोकांचा मृत्यू झाला आहे. एकूण मृत्यूंची संख्या ५ लाख ३६ हजार झाली आहे. अमेरिकेत दिवसेंदिवस परिस्थिती बिकट होत चालली आहे. तसेच ब्राजील आणि भारतात देखील सातत्याने रुग्णांची संख्या वाढत आहे.

अमेरिकेत रविवारी ४४ हजार, ब्राजीलमध्ये २६ हजार तर भारतात २४ हजार लोकांना कोरोना संसर्गाची बाधा झाली. स्पेनच्या उत्तर-पश्चिमी क्षेत्रातील गलिसियामध्ये कोविड-१९ चा प्रसार मोठ्या प्रमाणात होत आहे. तर श्रीलंकेत ११५ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर शाळा सुरु करण्यात येणार आहे. WHO चे प्रमुख टेडरॉस एडनहॅम यांनी म्हटलं की, कोरोना संसर्गामुळे पाच लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. काही देशांत महामारी वेगाने पसरत आहे. जसजसं लॉकडाऊन शिथिल केलं जाईल. तसतसं कोरोना संसर्गाची दुसरी लाटसुद्धा येत आहे. तर काही देशात संसर्गाचे रौद्र रुप अजूनही दिसलेलं नाही.

तसेच हाइड्रॉक्सीक्लोरोक्वीनच्या च्या परीक्षणांवर WHO कडून बंदी घालण्यात आली होती. मलेरिया विरोधी औषध हाइड्रॉक्सीक्लोरोक्वीन आणि एड्सवरील लोपिनवीर आणि रिटोनवीरचे एकत्र डोस देण्यावर पून्हा बंदी घातली आहे. डब्ल्यूएचओने सांगितल्यानुसार, या औषधाच्या वापराने मृत्युदरात कोणतीही घट झालेली नाही. उलट मृत्यूदर वाढतच चालला आहे.

रॉयटर्स या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी डब्ल्यूएचओने यासंदर्भात खुलासा केला आहे. औषधांच्या चाचणीवर लक्ष ठेवणाऱ्या आंतराष्ट्रीय संस्थेने केलेल्या शिफारसीनुसार या औषधांच्या वापरावर बंदी घालण्यात येत आहे. काही आठवड्यांपूर्वी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थने कोरोना संसर्गित रुग्णांच्या उपचारासाठी मलेरियाचे औषध हाइड्रॉक्सीक्लोरोक्वीन निष्प्रभ ठरत असल्याने क्लिनिकल ट्रायलवर बंदी आणली होती.