Coronavirus : चीन, इटली नंतर आता ‘या’ देशात ‘कोरोना’चा हाहाकार, एका दिवसात 418 रुग्णांचा ‘मृत्यू’

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – फ्रान्समध्ये सोमवारी कोरोना विषाणू या साथीच्या संसर्गामुळे 418 लोकांचा मृत्यू झाला. 1 दिवसात फ्रान्समध्ये या साथीने होणाऱ्या मृत्यूची ही सर्वाधिक संख्या आहे. सध्या फ्रान्समध्ये मृतांचा आकडा 3,024 वर पोचला आहे. फ्रान्स सरकारने दररोज जारी होणाऱ्या बुलेटिनमध्ये सांगितले आहे की कोविड -19 चे 20,946 रुग्ण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत, त्यापैकी 5,056 रुग्णांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे.

कोरोनामुळे युरोपपासून अमेरिकेपर्यंत भीषण परिस्थिती कायम आहे. कोविड -19 मुळे जगभरात जवळपास 38 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. तर सुमारे 8 लाख लोकांना संसर्ग झाला आहे. दुसरी नोंद अशी आहे की या आजारामुळे मृत्यू झालेले दोन तृतीयांश लोक हे युरोपमधील आहेत.

तसेच कोविड -19 मुळे इटलीमध्ये 10,779 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 97,689 लोक संक्रमित झाले आहेत. पहिल्या कोरोना विषाणूच्या पेशंटचा तेथे फेब्रुवारीच्या उत्तरार्धात मृत्यू झाला. आतापर्यंत 13,030 रूग्ण ठीक झाले आहेत.

स्पेनमध्ये गेल्या चोवीस तासात 812 लोकांच्या मृत्यूबरोबरच आत्तापर्यंत 7,340 रुग्णांचा या आजारामुळे मृत्यू झाला आहे. देशात या विषाणूचे 85,195 लोकांना संक्रमण झाले आहे.

सर्वात जास्त कोरोनाची प्रकरणे ही अमेरिकेत आहेत. अमेरिकेत, कोरोना विषाणूचे 1,43,055 लोकांना संक्रमण झाले आहे. त्यापैकी 2,514 लोकांनी आपला जीव गमावला आणि 4,865 लोक ठीक झाले आहेत.