‘कोरोना’मधून सावरल्यानंतर चीननं भारताशी नवे संबंध ठेवण्यासाठी केली ‘ऑफर’, जिनपिंग यांनी पाठवला ‘संदेश’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतासह जगातील सर्व देश कोरोनाच्या संकटाशी सामना करत आहेत, अशा परिस्थितीत चीनने भारताशी नवीन संबंध जोडण्याची ऑफर केली आहे. राष्ट्रपती राम नाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवलेल्या संदेशात चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी द्विपक्षीय सहकार्य आणि मुत्सद्दी संबंधांच्या 70 व्या वर्धापनदिनानिमित्त दोन्ही देशांचे अभिनंदन केले आहे. आपल्या संदेशात जिनपिंग यांनी म्हटले आहे की, गेल्या 70 वर्षात भारत आणि चीनने एकत्रितपणे विकास आणि शांततेच्या क्षेत्रात खूप महत्वाची कामे केली आहेत. आता हे सहकार्य आणि संबंध पुढे नेण्याची गरज आहे.

शी जिनपिंग यांनी आपल्या संदेशामध्ये असे लिहिले की, दोन्ही देश परस्पर सहकार्य वाढविण्यासाठी आणि सर्व क्षेत्रात संबंध बळकट करण्याच्या दिशेने सातत्याने पुढे जात आहेत. अनेक आंतरराष्ट्रीय प्रश्नांबाबतही दोन्ही देशांमध्ये चांगले समन्वय राहिले आहे.

ते म्हणाले की, त्यांना हे संबंध राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्यासोबत मिळून नव्या उंचीवर नेण्याची इच्छा आहे. यामुळे दोन्ही देशातील सामान्य लोकांना मोठा फायदा होईल. केवळ आशियाच नाही तर दोन्ही देशांनी एकत्र काम केले तर जगातील सर्व देशांमध्ये एक सकारात्मक संदेश जाईल.

शी जिनपिंग यांना दिलेल्या उत्तर संदेशात अध्यक्ष कोविंद यांनी गेल्या 70 वर्षात दोन्ही देशांचे संबंध आणि सहकार्य अतिशय महत्त्वपूर्ण मानले आहे. ते म्हणाले की, आगामी काळात दोन्ही देशातील लोकांमध्ये राजकीय, आर्थिक आणि आपआपसातील संपर्क अतिशय सकारात्मक भूमिका बजावतील.

शेजारचा देश असल्याने दोन्ही देशांमधील चांगले संबंध दोघांसाठीही चांगले आहे. तसेच आशियाई देशांव्यतिरिक्त जगातील सर्व देशांसाठी हे चांगले आहेत. ते म्हणाले की, भारत यासाठी सदैव सज्ज आहे आणि तसाच राहील.

यावेळी दोन्ही देशांच्या पंतप्रधानांमध्ये अभिनंदनही करण्यात आले. चीनमधील पंतप्रधान ली किंग यांनी आपल्या संदेशात पंतप्रधान मोदींसह दोन्ही देशांमधील चांगले आणि मजबूत संबंध दोन्ही देशांसाठी फायदेशीर असल्याचे वर्णन केले आहे. ते म्हणाले की, चीन भारताला आपल्या सर्व प्रकारात सहकार्य करण्यास तयार आहे आणि प्रत्येक आघाडीवर भारताबरोबर एकत्र काम करण्याची त्यांची इच्छा आहे.

पंतप्रधान मोदींनी आपल्या उत्तर संदेशात जवळजवळ अशाच गोष्टी बोलल्या आहेत. ते म्हणाले आहेत की, जगातील सर्व प्रमुख आणि महत्त्वपूर्ण प्रश्नांसाठी दोन्ही देशांनी एकत्र उभे राहिले पाहिजे, ज्याचा सर्वांना फायदा होईल. शांती आणि सहकार्याच्या दिशेने हे देखील एक नवीन उदाहरण असेल.

विशेष बाब म्हणजे या संदेशांमध्ये कोरोनामुळे झालेल्या विनाशाचा उल्लेख या दोन्ही देशांनी केला नाही. किंवा एकत्रितपणे लढा देण्यासाठी किंवा ही जगभरची महामारी टाळण्यासाठी सहकार्याची कोणतीही चर्चा केली नाही.

महत्त्वाचे म्हणजे चीन आता कोरोना संकटापासून मुक्त झाला आहे आणि तेथे जीवन सामान्य होत आहे. अशा परिस्थितीत चीनला आपली अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणून जागतिक बाजारात मदत करणारा देश म्हणून उदयास येऊन सर्व देशांमधील आपली नकारात्मक प्रतिमा काढून टाकायची आहे.

कोरोनाविरूद्धच्या युद्धात आता चीन अमेरिकेला मोकळेपणाने मदत करण्यासाठी पुढे येत आहे आणि चीनवर नेहमीच टीका करणारे ट्रम्प यांनी देखील माघार घेतली आहे, अशा परिस्थितीत चीन आता भारतासह सर्व देशात आपला बाजार राखण्याचे प्रयत्न करत आहे.

बांगलादेशने जपानी नागरिक पाठविले
बांगलादेशातील कोरोनाच्या वाढत्या घटनांमुळे दशहतीमध्ये राहणाऱ्या सर्व परदेशीयांना आपापल्या देशात पाठवण्याचे काम वेगाने चालू झाले आहे. 227 जपानी नागरिकांना बांगलादेशातून विशेष विमानाने टोकियो येथे पाठवले गेले आहे. बांगलादेश प्रमाणेच सर्व देश आपल्या येथे राहणाऱ्या परदेशी नागरिकांना आपल्या देशात परत पाठविण्यात गुंतले आहेत.

दुसरीकडे, पाकिस्तानमधील परिस्थिती बिघडल्यामुळे लॉकडाऊन 14 एप्रिलपर्यंत वाढविण्यात आले आहे. दुसरीकडे, विदेशात अडकलेल्या सुमारे 2000 पाकिस्तानी नागरिकांना परत आणण्यासाठी 4 ते 11 एप्रिल दरम्यान 17 विशेष विमानांचे संचालन केले जाईल.

बांगलादेशात आतापर्यंत 56 कोरोना पॉझिटिव्ह घटना घडल्या असून 6 लोकांचा मृत्यू झाला आहे, ढाका टाईम्सच्या वृत्तानुसार, बांगलादेशातील सुमारे 15,000 रुग्णवाहिका कोरोना पीडितांना आपला जीव धोक्यात घालून मदत करत आहेत. मास्क आणि कोणतीही खबरदारी न घेता हे कामगार रूग्णांना दवाखान्यात नेण्यासाठी दिवसरात्र काम करत आहेत. दरम्यान, बांगलादेश सरकारने एक आदेश जारी केला आहे की, देशातील कोणताही व्यक्ती मास्क असू नये आणि मास्क घालणे बंधनकारक आहे.

त्याचवेळी पाकिस्तानमध्ये कोरोना संक्रमित लोकांची संख्या 2373 वर पोहोचली आहे. पाकिस्तानमध्ये कोरोनामधून आतापर्यंत 32 लोकांचा मृत्यू झाला आहे. पंतप्रधान इम्रान खान यांच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रीय समन्वय समितीच्या बैठकीत तेथील नागरिकांना परदेशातून परत आणण्याचा निर्णय घेण्यात आला आणि लॉकडाऊन कालावधीही भारताप्रमाणेच 14 एप्रिलपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यातबरोबर सर्वसामान्यांना आवश्यक असलेल्या प्रत्येक वस्तूची गांभीर्याने अंमलबजावणी करण्यास व पुरवठा सुनिश्चित करण्यास सांगण्यात आले.