जगभरात एका दिवसात 1 लाख, 21 हजार नवे ‘कोरोना’ बाधित

वॉशिंग्टन : कोरोना विषाणुचा कहर देशभरात अजूनही सुरु आहे़ गेल्या २४ तासात जगभरातील २१५ देशात १ लाख २१ हजार नवीन कोरोना बाधित आढळून आले आहेत. ही आतापर्यंतची तिसरी उच्चांकी संख्या आहे. वल्डोमीटरनुसार, जगभरात आतापर्यंत ६५ लाख ६२ हजार लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यात आतापर्यंत ३ लाख ८६ हजार रुग्णांचा मृत्यु झाला आहे. तसेच ३१ लाख ६९ हजार रुग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत. जगभरातील ७५ टक्के रुग्ण हे केवळ १३ देशात आहेत. या देशात ४९ लाख कोरोना बाधित आहे.

अमेरिकेत आतापर्यंत १ लाख ९ हजारांहून अधिक रुग्णांचा मृत्यु झाला आहे. गेल्या काही दिवसात अमेरिकेपेक्षा ब्राझीलमध्ये जास्त रुग्णांचा दररोज मृत्यु होत आहे.

प्रमुख देशातील कोराना बाधित आणि मृत्युची संख्या

अमेरिका – १९०१७८३ – १०९१४२
ब्राझील – ५८३९८० -३२५४७
रशिया – ४३२२७७ – ५२१५
स्पेन – २६७४०६ – २७१२८
इग्लंड – २७९८५६ – ३९७२८
इटली – २३३८३६ – ३३६०१
भारत – २१६८२४ – ६०८८
जर्मनी – १८४४२५ – ८६९९
पेरू – १७८९१४ -४८९४
टर्की – १६६४२२ – ४६०९