चिंताजनक ! RT-PCR टेस्ट केल्यानंतर सुद्धा विषाणूचा थांगपत्ता लागेना; Virus ने शोधली नवीन जागा?

पोलीसनामा ऑनलाइन – मागील वर्षी कोरोनाने थैमान घातलं होत. यंदाही कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक वाढत आहे. दररोज रुग्ण वाढीची संख्या जास्त दिसून येत आहे. तर दुसरीकडे एक चिंताजनक बाब निर्माण झाल्याचं समोर आले आहे. तपासणी करण्यासाठी RT-PCR टेस्ट ही अधिक योग्य समजली जाते. मात्र RT-PCR टेस्ट करताना सुद्धा या विषाणूचा थांगपत्ता लागत नसल्याचं पुढं आले आहे. तर दिल्लीत अनेक काही हॉस्पिटलमध्ये काही रुग्ण असे ज्यांच्यामध्ये कोरोनाची लक्षणे दिसत आहेत, परंतु, कोरोनाची टेस्ट केली असता ते नकारात्मक (negative) येत आहे. अनेकवेळा टेस्ट केल्यानंतर सुद्धा अहवाल हा नकारात्मक येत असल्याचे समोर येत आहे.

या कोरोना विषाणूने नाक आणि घशात प्रत्यक्ष अस्तित्व निर्माण केले होते परंतु आता त्याचा थांगपत्ता लागेना. यामुळे स्वॅब सॅम्पलमधून त्याचे निदान होत नसल्याची शक्यता आहे. या विषाणूने एस रिसिप्टर्समध्ये जागा बनवली असावी. हा एस रिसिप्टर्स असे प्रथिनेअसतात जे फुप्फुस आणि पेशींमध्ये सापडतो. त्यामुळे जेव्हा फ्लुएड सँम्पलची टेस्ट होते तेव्हाच कोरोना विषाणूच्या संसर्गाचे निदान होत आहे अशी माहिती इंस्टिट्युट ऑफ लिव्हर अँड बायलरी सायन्सेसमधील क्लिनिकल मायक्रोबायोलॉजीच्या सहयोगी प्रा. डॉ. प्रतिभा काळे यांनी दिली आहे.

तसेच, या चाचणीबाबत डॉ. आशिष चौधरी यांनी म्हटले आहे, आमच्याकडे मागील काही दिवसांपासून असे अनेक रुग्ण आले आहेत. त्यांना ताप येत होता. श्वास घेण्यात त्रास होत होता. त्यांच्या फुप्फुसांचे सिटी-स्कॅन केले असता फिकट करड्या रंगाचा डाग दिसून येत होता. कोरोनाचे हे मोठे लक्षण आहे. अशा काही रुग्णांच्या तोंडातून किंवा नाकामधून एक यंत्र फुप्फुसांपर्यंत सोडण्यात आले आणि तेथील फ्लुएड एकत्र करून तपास करण्यात आला. तेव्हा असे रुग्ण कोरोनाबाधित असल्याचे दिसून आले. या प्रक्रियेला ब्राँन्कोलवेलार लेव्हेज म्हणतात. कोरोनाच्या प्रचलित टेस्टमध्ये नकारात्मक आलेले रुग्ण या प्रक्रियेमधून सकारात्मक आले आहे त्यांनी म्हटले आहे.

जवळपास १५-२० टक्के रुग्णांना या समस्येचा सामना करावा लागत आहे. काही रुग्णांत कोरोनाची लक्षणे दिसून येत आहे. परंतु त्यांची टेस्ट नकारात्मक येते. असे रुग्ण कोविड रुग्णालयांऐवजी खासगी हॉस्पिटलमध्ये भरती होतात. त्यामुळे आजाराचा संसर्ग होण्याचा धोका अधिकच वाढतो. मागच्या वर्षीच्या तुलनेत रुग्णांमधील लक्षणांमध्येही बदल दिसून येत आहे. त्यामुळे कोरोना विषाणूमध्ये उत्परिवर्तन झाल्याची शक्यता नाकारता येत नाही असे, मॅक्स हेल्थकेअरच्या पल्मोनोलॉजी डिव्हिजनचे डॉ. विवेक नांगिया यांनी म्हटले आहे. तसेच, सर्दी, खोकला, नाक गळणे आणि कंजक्टिवाइटिसची लक्षणे रुग्णांमध्ये दिसत आहेत. ही लक्षणे आधी दिसत नव्हती. अनेक रुग्णांना कफ, श्वास घेण्यास अडथळे वगैरे लक्षणे दिसत नाहीत. काहींच्या फुप्फुसाचे सिटीस्कॉनही नॉर्मल येत आहे. परंतु आटवड्यामध्ये वारंवार ताप येतो. त्यामुळे रुग्णांना हॉस्पिटलमध्ये न्यावे लागते. असे गंगाराम रुग्णालयाचे सिनियर कन्सल्टन्ट डॉ. अरुप बासू यांनी म्हटले आहे.