जिवंत राहिलो तर ऑलिम्पिक खेळेन, भारताचा कुस्तीपट्टू बजरंग पुनियाने केली भाीती व्यक्त

पोलीसनामा ऑनलाइन –  कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ऑलिम्पिक पुढे ढकलली जाण्याची शक्यता आहे. यासंदर्भात भारताचा कुस्तीपट्टू बजरंग पुनियासुद्धा कोरोनाची भाीती व्यक्त केली आहे. जिवंत राहिलो तर ऑलिम्पिक खेळू शकेन. आम्हीच नाही राहिलो तर ऑलिम्पिकचे काय? असा सवाल बजरंग पुनियाने विचारला आहे. ऑलिम्पिकची तयारी करत आहे. पण स्पर्धा वेळेवर होईल का अशी शंका त्याला आहे. पुनिया म्हणतो की, सध्याची परिस्थिती पाहता स्पर्धा पुढे ढकलणे योग्य ठरणाार असल्याचे त्याने सांगितले.

कोरोनाचा फटका टोकियो ऑलिम्पिकलाही बसण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ऑलिम्पिकवर टांगती तलवार आहे. सध्याचे वातावरण इतके धोकादायक आहे की ऑलिम्पिक स्थगित करणे चांगले ठरणार आहे. हे फक्त आपल्यासाठी नाही तर सर्व देशांमधील अ‍ॅथलीटसाठी फायद्याचे आहे. प्रत्येकासाठी ही कठीण वेळ आहे.

आयओसीने शेड्युलनुसार स्पर्धा खेळवण्याचा विचार केला आणि इतर देशही सहभागी झाले तर आम्हालाही जावे लागणार आहे. मात्र ऑलिम्पिकसाठी किमान दोन-चार महिने वाट बघावी. परिस्थिती सुधारायला हवी असे मत पुनियाने व्यक्त केले आहे. खरं सांगायचे तर मी सध्या ऑलिम्पिकबद्दल विचार करत नाही. सध्यातरी आम्हाला व्हायरसपासून सुरक्षित रहायला हवे. याचा अर्थ असा नाही की प्रशिक्षण, सराव बंद केला आहे. मात्र त्याचसोबत आपल्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. मी सध्या सोनीपत इथे घरात बंद करून घेतल्यासारखे राहत आहे. तिथेच सराव करत आहे. टोकियो ऑलिम्पिकचे असे काउंटडाउन करावे लागेल अशी कधीही कल्पना केली नव्हती असे मत बजरंग पुनियाने व्यक्त केले आहे.

You might also like