‘कोरोना’मुळं आजारी असलेल्या वुहानच्या डॉक्टरची स्कीन झाली होती ‘काळीकुट्ट’, आता झाला मृत्यू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना विषाणूमुळे आजारी असलेल्या चीनच्या वुहानमधील डॉक्टरची कातडी काळी पडली आहे. आता त्याच्या मृत्यूची बातमी समोर आली आहे. हू विफेंगला जानेवारीमध्येच कोरोनाचा संसर्ग झाला होता. चिनी माध्यमांनी हू विफेंगचा एक फोटो प्रकाशित केला होता ज्यामध्ये त्याच्या त्वचेचा रंग बदललेला दाखविला होता. यानंतर, विफेंगच्या प्रकरणाने सर्वांचेच लक्ष वेधले.

दरम्यान, हू विफेंगचे सहकारी डॉक्टर यी फारनची कातडीही काळी पडली होती, परंतु तो बरा झाला. माहितीनुसार, हू विफेंगचा एका महिन्यापेक्षा जास्त काळ आयसीयूमध्ये उपचारानंतर मृत्यू झाला. कोरोना विषाणूने आजारी पडल्यानंतर त्याच्या शरीरातील इतर समस्याही वाढल्या. यापूर्वी वुहान सेंट्रल हॉस्पिटलमधील प्रवक्त्याने सांगितले की, अँटीबायोटिक्सच्या अत्यधिक वापरामुळे त्याची त्वचा काळी झाली.

हू विफेंग चीनचे व्हिसल ब्लोअर डॉक्टर ली वेनलियांग यांच्याबरोबर काम करायचे. दरम्यान, ली वेनलियांग यांनीच इतर डॉक्टरांना कोरोना विषाणूच्या प्रसाराबद्दल सर्वप्रथम इशारा दिला. पण त्यावेळी चिनी पोलिसांनी त्यांना धमकावून शांत केले होते. ली आणि हू दोघांनीही वुहान सेंट्रल हॉस्पिटलमध्ये काम केले. नंतर, ली याला कोरोनाचा संसर्ग झाला आणि त्याचा मृत्यू झाला. ली वेनलियांग प्रकरणामुळे चीनवर कोरोनाबद्दल सत्य लपविल्याचा आरोप होता.