Coronavirus : ‘कोरोना’ व्हायरस लीक प्रकरणातील संशयित चीनी लॅबनं डिलीट केले सर्व फोटो

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था  –   कोरोना विषाणूच्या कथित लीक प्रकरणात संशयीत असल्याचे समजल्या जाणार्‍या चिनी प्रयोगशाळेने आपल्या वेबसाइटवरील अनेक फोटो हटवले आहेत. माहितीनुसार या फोटोंमध्ये असे दिसून आले आहे की, चिनी लॅबमध्ये काम करणारे कर्मचारी पुरेसे सेफ्टी सॅन्डर्ड फॉलो करत नाहीत. कोरोना विषाणूच्या प्रसारासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह अनेक जागतिक नेते चिनी लॅबवर प्रश्न उपस्थित करीत आहेत. अमेरिकन अधिकाऱ्यांनीही या प्रकरणात तपास सुरू केला आहे.

या अहवालानुसार गेल्या महिन्यात वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीने असे काही फोटो डिलीट केले होते ज्यात वैज्ञानिक चिनी लॅबमध्ये काम करताना दिसले होते. एवढेच नव्हे तर प्रयोगशाळेने अमेरिकन डिप्लोमॅटच्या भेटीशी संबंधित माहितीही एडिट केली आहे. दरम्यान, अमेरिकन डिप्लोमॅटने चिनी प्रयोगशाळेत वटवाघूळांना आढळलेल्या कोरोना विषाणूवरील प्रयोगाबाबत चेतावणी दिली होती. त्याचवेळी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या आठवड्यात सांगितले की, त्यांनी गुप्तचर कागदपत्रे पाहिली आहेत, त्या आधारावर त्यांना विश्वास आहे की वुहान इन्स्टिट्यूटमधील कोरोना विषाणू जागतिक संकटाचे मूळ आहे.

वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी वेबसाइटच्या एका पृष्ठावर, कर्मचारी वटवाघुळातून कोरोना विषाणूचे नमुने गोळा करण्यासाठी गुहेत जात असल्याचे दर्शविले गेले. या वेळी संस्था कर्मचार्‍यांकडे संरक्षक उपकरणे फारच कमी आहेत.

गेल्या महिन्यात एका अहवालात असा दावा करण्यात आला होता कि, व्हायरस संस्थेच्या प्रयोगशाळेत फ्रीझमध्ये ठेवण्यात आले होते. एका चित्रात अशाच एका फ्रीझचे सील तुटलेले पहिले गेले होते. त्याचवेळी अमेरिकेच्या नॅशनल इंटेलिजन्स डायरेक्टरच्या कार्यालयाने एक निवेदन जारी केले आहे की, इंटेलिजन्स कम्युनिटी या गोष्टीचा तपास करेल कि, कोरोना विषाणू संक्रमित प्राण्यांद्वारे मनुष्यात पसरला कि, वुहानच्या प्रयोगशाळेत झालेल्या अपघातामुळे पसरला.